मुक्तपीठ टीम
भारतात लग्न म्हणजे ‘पवित्र नातं’ मानलं जातं. तरीही पतीनं पत्नीवर शरीकसंबंधांसाठी सक्ती केल्यास त्याला बलात्काराचा गुन्हा मानला जात नाही. त्याविरोधातील ‘वैवाहिक बलात्कारा’शी संबंधित याचिकेला विरोध करताना केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, भारताने या प्रकरणात सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे. या बाबतीत आपण पाश्चिमात्य देशांचे आंधळेपणाने अनुकरण करू नये. तिथे वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानला जातो, पण भारताच्या स्वतःच्या समस्या आहेत. भारतातील साक्षरता, आर्थिक दुर्बलता, महिला सक्षमीकरणाचा अभाव, गरिबी अशी अनेक कारणे आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
वैवाहिक बलात्काराची व्याख्या नाही!
- आपल्या लेखी उत्तरात केंद्र सरकारने म्हटले आहे की, कोणत्याही कायद्यानुसार वैवाहिक बलात्काराची व्याख्या करण्यात आलेली नाही.
- तर आयपीसीच्या कलम ३७५ अंतर्गत बलात्काराची व्याख्या करण्यात आली आहे.
- केंद्राने म्हटले आहे की हा गुन्हा घोषित करण्यासाठी व्यापक आधार आवश्यक आहे.
- यासाठी समाजात एकमत व्हायला हवे. वैवाहिक बलात्कार म्हणजे काय?हे सांगण्याची आवश्यकता आहे.
वैवाहिक बलात्कार सिद्ध करणे कठीण!
- केंद्राने सांगितले की, आयपीसीच्या कलम ३७६ अंतर्गत आरोपींना शिक्षा करण्याच्या अनेक तरतुदी आहेत.
- जसे की दुखापतीच्या खुणा, प्राणघातक हल्ला, शरीराच्या अवयवांना बळजबरीने स्पर्श करणे, परंतु वैवाहिक बलात्कारात हे पुरावे पुष्टी करणे कठीण होईल.