मुक्तपीठ टीम
मुंबईतील यावर्षाचे तिसरे अवयवदान प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये हे अवयवदान करण्यात आले. ४७ वर्षे वयाच्या पुरुषाचे चार अवयव आता चार गरजूंच्या कामी येणार आहेत. यामुळे गरजू रुग्णांंना हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि कॉर्निया हे अवयव मिळाल्यामुळे त्यांनाही जीवदान मिळणार आहे. मुंबई ‘झेडटीसीसी’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वितरण केले आहे, अशी माहिती ‘झेडटीसीसी’च्या समनव्यक उर्मिला महाजन यांनी दिली.
अवयवदात्यांच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया
“आपल्या आवडत्या व्यक्तीला गमावणे कधीही सोपे नसते. तुम्ही नेहमी आमच्या विचारांमध्ये आणि प्रार्थनेत असाल. आम्हाला तुमची आठवण येईल आणि आयुष्यभर तुमची पोकळी कोणीही भरून काढू शकणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आम्ही नेहमी तुमची आठवण ठेवू.
नातेवाईकांचे विचार प्रेरणादायी!
“आता तुमच्या शेवटच्या इच्छेनुसार तुमचे अवयवदान केल्यामुळे तुम्ही सदैव जिवंत राहाल. तुम्ही आमच्यासाठी खरे प्रेरणास्त्रोत आहात,” अवयवदात्यांच्या नातेवाईकांच्या या उदात्त विचारांमुळे डॉक्टरही भारावून गेले. “मुंबई झेडटीसीसी”चे सरचिटणीस डॉ. भरत शहा म्हणाले, ‘अवयवदानाचा उदात्त विचार करणाऱ्या कुटुंबाची ही विचार प्रक्रिया खरोखरच प्रेरणादायी आहे.