Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अरबी खवय्ये चाखणार ‘महानंद’ तुपाची चव, आखाती देशांमध्ये निर्यातीचा शुभारंभ!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Mahanand ghee

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील संस्थांनी बनवलेल्या ‘महानंद’ तुपाची आता आखाती देशामध्ये निर्यात करण्याचा शुभारंभ झाला आहे. त्यामुळे अरबी खबय्यांना महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल तुपाची चव चाखायला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते, उपाध्यक्ष डी. के. पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या, व्यवस्थापकीय संचालक श्यामसुंदर पाटील- तसेच दूध महासंघाचे पदाधिकारी व अधिकारी तसेच प्रशांत पवार, प्रवीण सांगळी व प्रवीण पवार उपस्थित होते. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निर्यात सुरु झाली.

 

या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने महापौर पेडणेकर यांनी महानंद दुग्धशाळा आणि मे. पोर्ट शिपिंग अँड लॉजिस्टिक इंडीया लि. यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मुंबई महापालिकेअंतर्गत महानंदसाठी शक्य ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

महानंद दुग्धशाळेचे “तुप” दुबई, तसेच मध्य आशियाई या आखाती देशामध्ये निर्यात करण्यात येत असून ही बाब महानंद दुग्धशाळा व दूध महासंघासाठी सुवर्ण मानबिंदू आहे. महानंद दुग्धशाळेचे “तुप” आखाती देशामध्ये निर्यात करण्यासाठी मे. पोर्ट शिपींग अँड लॉजिस्टीक इंडीया लि. ह्यांना प्राधिकृत निर्यातदार संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
महानंद दुग्धशाळेची स्थापना दि. १८ ऑगस्ट १९८३ रोजी शेतकऱ्यांच्या हितासाठी झाली. दूध महासंघाचे ८५ तालुका/जिल्हा सभासद असून दूध संघाचे सभासद सहकारी दूध उत्पादक संस्था आहेत. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांशी दूध महासंघ जोडलेला आहे. दूध महासंघाचे दुध व दुग्धजन्य पदार्थ हे ग्राहकांच्या नेहमीच पसंतीस उतरलेले आहे. श्रीखंड, आम्रखंड व पनीर इ. मध्ये दूध महासंघाने इतरही अनेक दुग्धपदार्थांची वाढ करून लस्सी, छास, सुगंधीत दूध, तूप, ताक व दही इ. दुग्धपदार्थांचा समावेश करून वैविध्य आणले. महानंदच्या सर्व दुग्धपदार्थांचा दर्जा अत्यंत उत्तम असल्यामुळे ग्राहकांनी या दुग्धपदार्थाना नेहमीच पसंती दिलेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


Tags: Export of Mahanand gheegood newsGulf countriesM / s. Port Shipping and Logistics India LimitedMahanand DairyMaharashtra Co-operative SectorMaharashtra State Cooperative Milk FederationmuktpeethMumbai Municipal Corporationअरबी खवय्येआखाती देशचांगल्या बातम्यामहानंद तूपमहानंद दुग्धशाळामहाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघमहाराष्ट्र सहकार क्षेत्रमुक्तपीठमुंबई महापालिकामे. पोर्ट शिपिंग अँड लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड
Previous Post

राज्यात २४ हजार ९४८ नवे रुग्ण, ४५ हजार ६४८ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

Next Post

मुंबईतील नव्या वर्षाचे तिसरे अवयवदान! चार अवयवांमुळे चार गरजूंना जीवनदान!!

Next Post
Organ donation

मुंबईतील नव्या वर्षाचे तिसरे अवयवदान! चार अवयवांमुळे चार गरजूंना जीवनदान!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!