मुक्तपीठ टीम
सरडा हा खूप सभोतालच्या परिस्थितीनुसार रंग बदलतो. मात्र, राजकारणी त्यांच्यापेक्षाही वेगानं बदलतात, असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र, गोव्यातील राजकारणी हे पक्ष बदलण्याच्याबाबतीत सरड्यालाही लाजवणारे ठरल्याचे दिसत आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरच्या ताज्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षात गोव्यातील किमान साठ टक्के आमदारांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्यात.
गोव्याचा विचित्र विक्रम
- गोव्यात गेल्या पाच वर्षांत, जवळजवळ २४ आमदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले आहेत.
- गोव्याच्या ४० सदस्यांच्या विधानसभेतील एकूण संख्याबळाच्या ६० टक्के आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.
- गोव्याने पक्षांतरांच्या प्रकरणात एक विचित्र विक्रम केला आहे.
- ज्याचे भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एकच उदाहरण आहे.
- गोव्यात १४ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, त्यामुळे ही आकडेवारी मांडली गेली आहे.
आमदारकी सोडून पक्षांतर करणाऱ्यांची नावे नाहीत
- एडीआरने सादर केलेल्या २४ आमदारांच्या यादीत विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांची नावे नाहीत.
- या तीन आमदारांनी २०१७ मध्ये काँग्रेस आमदार म्हणून विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
- त्यानंतर त्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करून त्यांच्यावतीने नव्याने निवडणूक लढवली होती.
- २०१९ मध्ये काँग्रेसचे १० आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले.
कोण कोण इथून तिथं?
काँग्रेसमधून भाजपा
- जेनिफर मॉन्सेरेट (तालिगाव)
- फ्रान्सिस्को सिल्व्हेरिया (सेंट आंद्रे)
- फिलिप नेरी रॉड्रिग्ज (वेलीम)
- विल्फ्रेड नाझरेथ मेनिनो डी सा (नुवेम)
- क्लॅफसिओ डायस (कंकोलिम)
- अँटोनियो कॅरानो फर्नांडिस (सेंट क्रूझ)
- नीळकंठ हलर्णकर (तिविम)
- इसिडोर फर्नांडिस (कॅनकोना)
- चंद्रकांत कवळेकर
- रवी नाईक (फोंडा)
मगोपमधून भाजपा
- दीपक पौसकर (संवरडेम)
- मनोहर आजगावकर (पर्नेम)
गोवा फॉरवर्ड पक्षातून भाजपा
- जयेश साळगावकर (साळीगाव)
काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेस
- लुइझिन्हो फालेरो (नावेलीम)
२०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेले माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ यांनीही अलीकडेच टीएमसीमध्ये प्रवेश केला. २०१७ च्या निवडणुकीत, काँग्रेस ४० सदस्यांच्या सभागृहात १७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. परंतु, १३ जागा जिंकणारा भाजप अपक्ष आमदार आणि प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन करू शकला नाही.