मुक्तपीठ टीम
5G म्हणता, म्हणता 6G ची तयारी सुरू झाली आहे. इंटरनेटच्या जगात धावता वेग वाढला आहे. आता रिलायन्स जियोने 6Gकडे वाटचाल केली आहे. जियोने आज 6G विकसित करण्यासाठी औलू विद्यापीठासोबत भागीदारीची घोषणा केली आहे. येत्या काळात 6G ला देशात आणण्यासाठी हे एकत्र काम केले जात आहे. देशात 5G आल्यानंतर मशीन टाईप कम्युनिकेशन आणि व्हर्च्युअल कामाला चालना मिळेल. दुसरीकडे, 6G च्या आगमनाने, कॉल-फ्री MIMO, इंटेलिजेंस सरफेस आणि तेरा-हर्ट्झ फ्रिक्वेन्सी सपोर्ट या सुविधा मिळतील. मिळालेल्या माहितीनुसार, 5G आणि 6G एकत्र काम करू शकतील. याद्वारे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात इंटरनेट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
इंटरनेट विश्वात 6Gची महत्त्वाची भूमिका
- हवाई आणि अंतराळ संप्रेषण
- होलोग्राफिक बीमफॉर्मिंग
- ३डी कनेक्टेड इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी
- मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स
- फोटोनिक
या क्षेत्रांमध्ये 6Gचा होणार मोठा फायदा
6G इंटरनेटमुळे, डिफेन्स, ऑटोमोटिव्ह, व्हाईट गुड्स, इंडस्ट्रियल, कंझ्यूमर गुड्स, मॅन्युफॅक्चरिंग, स्मार्ट डिव्हाइस एनव्हायरमेंट, कंम्प्यूटिंग आणि ऑटोनॉमस ट्रॅफिकमध्ये मोठे बदल दिसून येतील.
जियोचे भारतात ४०० दशलक्षाहून अधिक ग्राहक
- जियोचे भारतात ४०० दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत.
- जियो प्लॅटफॉर्मकडे त्यांच्या 5G रॅन आणि कोअर प्लॅटफॉर्मसाठी आधीपासूनच सक्रिय विकास कार्यक्रम आहे, ज्याची सुविधा जियो लॅब्सद्वारे करण्यात आली आहे.
- हे सहकार्य जियोच्या 5G क्षमतांचा आणखी विस्तार करेल. तसेच 6G इंटरनेटला ही याचा उपयोग होईल.
- रिलायन्स जियो 5G च्या बाबतीतही खूप पुढे आहे.
- जियो पूर्णपणे मेड इन इंडिया 5G वर काम करत आहे.
- जियोची 5G इंटरनेट लॉंचिंगची संपूर्ण तयारी झालेली आहे.
- कंपनी फक्त सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यासह, कंपनीने 6G विकसित करण्याचे काम सुरू केले आहे.