मुक्तपीठ टीम
इंडिया गेटवर गेल्या ५० वर्षांपासून तेवत असणाऱ्या अमर जवान ज्योत तेथे बंद करून शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारक’ येथे असलेल्या ज्योतीत मध्ये विलिन होणार आहे. ‘अमर जवान ज्योती’ची स्थापना १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ करण्यात आली होती. यावेळी भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली होती. तिचे उद्घाटन भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते. त्यामुळे केवळ ती आठवण पुसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार ती ज्योत बंद करत असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मोदी सरकारला लोकशाही परंपरा आणि प्रस्थापित परंपरेचा आदर नाही, मग ते संसदेत असो किंवा बाहेर… अमर जवान ज्योतीला पन्नास वर्षांनंतर मिळालेले पावित्र्य हलक्यात घेतले जात आहे, असा आरोप केला आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “आपल्या शूर जवानांसाठी जी अमर ज्योती जळत होती ती आज विझणार आहे, हे दुःखद आहे,” असे म्हटले आहे.
अमर जवान ज्योतीचे उद्घाटन इंदिरा गांधी यांच्या हस्ते
- १९७१ मध्ये, भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जानेवारी १९७२ रोजी अमर जवान ज्योतीचे उद्घाटन केले.
- अमर जवान ज्योतीच्या मशालीबाबत लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘अमर जवान ज्योती’चे आज दुपारी राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलिनीकरण केले जाईल.
- इंडिया गेटच्या दुसऱ्या बाजूला अगदा चारशे मीटरवरच हे ठिकाण आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन
- नरेंद्र मोदी सरकारतर्फे इंडिया गेटच्या परिसरात राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आले होते.
- याचे उद्घाटन २०१९ मध्ये झाले होते.
- यावर २५ हजार ९४२ सैनिकांची नावे सुवर्णक्षरांनी कोरली गेली आहेत.
- युद्ध स्मारकाच्या भवनमध्ये सैनिकांच्या औपचारिक कार्यक्रमांचे यामध्ये स्थलांतर केले होते.
सोशल मीडियावर #IndiaGate ट्रेंडिंग
#IndiaGate सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे ज्यावर लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अमनदीप सिंग यांनी ट्विट केले की, अखेरीस… ५० वर्षांनंतर अमर जवान ज्योती इंडिया गेटवर विझवली जाईल… ज्वाला राष्ट्रीय युद्ध स्मारकात नेली जाईल आणि तिथे अनंत ज्वालांमध्ये विलीन होईल.
शशी थरूर यांचे ट्वीट
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट केले की या सरकारला लोकशाही परंपरा आणि प्रस्थापित परंपरेचा आदर नाही, मग ते संसदेत असो किंवा बाहेर… अमर जवान ज्योतीला पन्नास वर्षांनंतर मिळालेले पावित्र्य हलक्यात घेतले जात आहे.
राहुल गांधी यांचे ट्वीट
आपल्या शूर जवानांसाठी जी अमर ज्योती जळत होती ती आज विझणार आहे, हे दुःखद असल्याचे राहुल गांधींनी ट्विट केले आहे.
It is a tasteless step which reflects on the mental attitude of the person who decided this change.
Reflects badly on the mentality of the decision makers.