Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अस्थायींना स्थायी करा’ च्या नाऱ्याने दुमदुमला ‘जे जे रुग्णालया’चा परिसर

२०० हुन अधिक सहाय्यक प्राध्यापकांचा कँडल मार्च

January 21, 2022
in घडलं-बिघडलं
0
JJ hospital candle march

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र शासनाच्या जे जे रुग्णालयातील सेवेत समावेश करण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषणास बसलेल्या महाराष्ट्रातील १८ वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांनी कँडल मार्च काढला. सोमवार, १७ जानेवारीपासून सहाय्यक प्राध्यापक उपोषणास बसले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा असाच चालू राहणार आहे, असे कँडल मार्चच्या वेळी सांगण्यात आले.

Candle march of 200 assistant professors outside JJ Hospital

‘आमच्या आयुष्यातील अनिश्चिततेचा अंधकार दूर व्हावा व लवकरात लवकर आम्हाला शासनात समावेश करावे आणि आमच्या मागण्यांना न्याय मिळावा, अशी मागणी वैद्यकीय शिक्षकांनी यावेळी व्यक्त केली.  मागील ५ हुन अधिक वर्ष आम्ही या रुग्णालयात सेवा देतोे, लाखो रुग्णांचे प्राण वाचवत आहोत, हजारो विद्यार्थ्यांना शिकवतो शिवाय शैक्षणिक कामकाजाबरोबर इतर अनेक प्रशासकीय कामे करतो, अनेक कॅम्पच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आहोत. तरीही आम्ही अधिकारापासून वंचित आहोत अशी खंत डॉक्टरांनी व्यक्त केली.

 

‘आमचे वृद्ध आई वडील, लहान मुले आहेत. दरवर्षी आम्हाला १ दिवसाचा खंड देऊन किंवा कित्येक जण ४ महिन्यांच्या आॅर्डरवर काम करतात. पुढची आॅर्डर वेळेवर निघेल की नाही याची अनिश्चितता सतत •ोडसावते. आम्ही खाजगी रुग्णालयात लाखो रुपये कमावू शकलो असतो किंवा इतर राज्यात जाऊन सेवा दिली असती, मात्र आपल्या लोकांची सेवा करत आहोत. कित्येक वर्ष आम्ही कंत्राटी पदावर काम करत आहोत. सरकारने वेळोवेळी आम्हाला समावेश करण्यात येईल, अशी ‘फक्त’ आश्वासने दिली. पण आता आमच्या संयमाची सीमा संपत आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातून ‘कँडल मार्च’साठी सगळे इथे जमले आणि साखळी उपोषण करत आहोत. पण आमच्या आंदोलनाची राज्य सरकारने साधी दखलही घेतली नाही, हे खूप विदारक आहे, असे डॉ. प्राजक्ता थेटे म्हणाल्या.

 

‘आमचा जे.जे. रुग्णालयाच्या सेवेत समावेश झालाच पाहिजे,  कोविड योद्ध्यांना न्याय द्या, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना स्थायी करा, असे नारे या अस्थायी डॉक्टरांनी दिले. या ना-यांमुळे कदाचित झोपलेले सरकार जागे होऊन, आमच्या मागण्या मान्य करेल, असे अपेक्षा डॉ. अमित यांनी व्यक्त केली. काल ह्याच डॉक्टरांनी रक्तदान शिबीर आयोजिले होते.


Tags: Candle MarchJJ hospitalकँडल मार्चजे.जे. रुग्णालय
Previous Post

इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत विझवण्यामागेही राजकारण? का होत आहे विरोध?

Next Post

दीपा देशमुख यांचे ‘जग बदलणारे ग्रंथ’ स्टोरीटेल मराठीवर!

Next Post
Deepa deshmukh

दीपा देशमुख यांचे 'जग बदलणारे ग्रंथ' स्टोरीटेल मराठीवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!