मुक्तपीठ टीम
चेक गणराज्य येथील प्रसिद्ध गायिका हाना होरका यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वयाच्या ५७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून यासंदर्भातील माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे. त्यांनी कोरोना लस घेतली नव्हती. कारण त्या कोरोना लसविरोधी मोहिमेत सहभागी होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये हाना यांनी त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती दिली होती.
होरका यांनी कोरोनाची लस घेतली नव्हती
- हाना होराका या असोनन्स बँडची गायिका होत्या.
- होरका यांचा मुलगा रेक आणि त्यांच्या पतीने संपूर्ण लसीकरण केले होते.
- रेकने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आईने मात्र, कोरोनाची लस घेतली नव्हती.
- रेकने सांगितले की त्याला आणि त्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती आणि आईने आठवडाभर वेगळे राहायला हवे होते पण ती संपूर्ण वेळ आमच्यासोबत होती.
- तेव्हा तिला कोरोना झाला.
- तिचे प्रकृती दिवसेंदिवस बिघडली आणि अखेर तिची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली’.
लसीवर विश्वास न ठेवणाऱ्या गायिका हाना होरका यांच्या मृत्यूबद्दल धक्कादायक बाब सांगितली जाते. असं म्हणातात की, त्यांनी जाणूनबुजून हेल्थ पाससाठी स्वतःला कोरोना होऊ दिला. त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की या आरोग्य पासमुळे त्यांना सौना (स्टीम बाथ) आणि थिएटरला भेट देण्याची परवानगी मिळाली. चेक गणराज्यात सिनेमा, बार आणि कॅफेसह अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी लसीकरणाचा पुरावा आवश्यक असतो. किंवा हेल्थ पास.
होरकाबद्दल बोलताना ते म्हणाले की, आम्हाला कोरोना असूनही त्यांनी आमच्यासोबत नेहमीप्रमाणे राहण्याचा निर्णय घेतला आणि लसीकरण करण्यापेक्षा या आजाराचा स्वीकार करणे पसंत केले.
हाना होरका यांच्या मुलानं म्हणजेच रेकनं वॅक्सिन विरोधी आंदोलन करणाऱ्या लोक हे त्याच्या आईच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचाही आरोप केला. त्या लसविरोधी आंदोलन करणाऱ्या लोकांनी हाना यांना लस घेण्यापासून थांबवलं होतं, असंही रेकनं सांगितलं. लसीकरण विरोधी मोहिमेत हाना सहभागी होत्या.