मुक्तपीठ टीम
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ५ हजार ९५६ कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई मनपाने नवा मिर्णय घेतला आहे. मुंबईत वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता शहरातील विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
मुंबई मनपाने यासंदर्भातलं ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये मुंबई मनपानं लिहिलं की, मुंबईतील सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे विवाह नोंदणी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मात्र भेटीची वेळ, तारीख आणि वेळ या सुविधेसह लवकरच ही सेवा पुन्हा सुरू केली जाईल.पुढे जाऊन मनपा व्हिडिओ केवायसी पर्यायाची तरतूद देखील शोधत आहे, असं मनपाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मुंबईत कोरोना परिस्थिती
- गेल्या २४ तासात मुंबईत ५ हजार ९५६ रुग्णांची नोंद झाली आहे.
- तसेच एका दिवसात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
- मुंबईत रविवारच्या तुलनेने सोमवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत जवळपास दोन हजारांची घट झाल्याचं चित्र आहे.
- त्यामुळे मुंबईकरांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे.
- ठाणे परिसरात २,१७८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर नवी मुंबई मनपा १२१२ रुग्णाची नोंद झाली आहे.
- कल्याण डोंबवली मनपात ७३९ रुग्णांची नोंद झाली आहे तर उल्हासनगर मनपा २०२, भिवंडी निजामपूर मनपा ७० आणि मीरा भाईंदर मनपा ३६१ रुग्णांची नोंद झाली आहे.
- पालघर १०४ आणि वसईविरार मनपा ३६६ रुग्णांची नोंद झाली आहे.
- गेल्या २४ तासात मुंबईत ६५६ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.