मुक्तपीठ टीम
पुण्यात बॉम्बे इंजिनीअर ग्रुप अॅंड सेंटर खडकीमध्ये स्टोअर कीपर ग्रेड ३ या पदासाठी ३ जागा, सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर या पदासाठी २२ जागा, कुक या पदासाठी ९ जागा, लास्कर या पदासाठी ६ जागा, एमटीएस मेसेंजर या पदासाठी ८ जागा, एमटीएस वॉचमन या पदासाठी ७ जागा, एमटीएस गार्डनर या पदासाठी ५ जागा, एमटीएस सफाईवाला या पदासाठी २ जागा, एमटीएस वॉशरमन या पदासाठी २ जागा, बार्बर या पदासाठी १ जागा अशा एकूण ६५ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १२वी उत्तीर्ण
- पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय/ एनसीव्हीटी (ट्रेड- रेजिमेंटल सर्वेयर टेक्निकल, इलेक्ट्रिशियन, फिटर, इंजिन आर्टिफिसर, वेल्डर, अर्टिसन बांधकाम, अर्टिसन मेटलर्जी, अर्टिसन कारपेंटर, पेंटर अॅंड डेकोरेटर, पीसीआर अॅंड डीएसव्ही)
- पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
- पद क्र.४,५,६,७,८,९ आणि १० साठी- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
कमांडंट, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी, पुणे- ४११००३
अधिक माहितीसाठी भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाइट https://indianarmy.nic.in/home वरून माहिती मिळवू शकता.








Subscribe