मुक्तपीठ टीम
केरळमधील कोट्टायम येथे पत्नी स्वॅपिंग रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. रविवारी हे ‘घटकंचुकी’ सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका सदस्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी सांगितले की, ७ जणांना अटक करण्यात आली असून २५ जणांवर नजर ठेवण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत आणखी अटक करण्यात येणार आहे.
महिलेने करुकाचल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, तिच्या पतीने तिला इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तिच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवल्याचे महिलेने सांगितले. आरोपी पतीला अटक केल्यानंतर पोलिसांना एका मोठ्या नेटवर्कचा सुगावा लागला. जवळपास ५०० जोडपी या रॅकेटशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
करुकाचल पोलिसांनी सांगितले की, हे रॅकेट फेसबुक आणि टेलिग्रामसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चालवले जात होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या रॅकेटमध्ये अनेक उच्चभ्रू लोकांचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेले हे कोट्टायम, पठानमथिट्टा आणि अलापुझा जिल्ह्यातील आहेत. रॅकेटमध्ये सामील असलेले जोडपे जेव्हाही भेटायचे तेव्हा त्यांच्या पत्नींची देवाणघेवाण करायचे. कधीकधी एक स्त्री एकाच वेळी तीन पुरुषांनी सामायिक केली होती. अनेक अविवाहित मुलांनी इतर पुरुषांचे पार्टनर शेअर करण्यासाठी पैसेही दिले.
बायकांची अशी व्हायची अदलाबदली
- एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून समविचारी लोकांची निवड करण्यात आली आणि खासगी ‘कपल स्वॅपिंग’ गटांमध्ये पत्नींची देवाणघेवाण करण्यात आली.
- या रॅकेटमधून अनेक जण फेसबुकशी जोडले गेले होते.
- हे रॅकेट बनावट सोशल मीडिया अकाऊंट वापरत होते, त्यामुळे त्याच्याशी संबंधित सर्व लोकांना पकडण्यासाठी वेळ लागेल.
- या प्रकरणाचा कसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- या प्रकरणाशी संबंधित लोकांची सर्व माहिती काढली जात असून या गटातील लोकांचे अन्य कोणत्या गटातील लोकांशी संबंध आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
‘घटकंचुकी’ म्हणजे काय?
- पुण्यात पेशवाईत काहींची घटकंचुकी चालत असे.
- काही निवडक स्त्री-पुरुष रंगमहालात जमून स्त्रियांच्या चोळ्या एका घटात घालत.
- ज्या पुरुषाला ज्या स्त्रीची चोळी सापडे तिच्याशी तो सर्वांदेखत कामक्रीडा करत असे.
- या पाशवी खेळाला घटकंचुकी म्हणत. ही घटकंचुकी कर्नाटकातही पाचपन्नास वर्षोंपूर्वी प्रघातात होती.