मुक्तपीठ टीम
समाजमाध्यमांवर रोज हजारो खरंतर लाखो व्हिडीओ वायरल होत असतात. त्यातील अनेक खूप चांगले असतात. काही विडियो असे ही असतात जे पाहिल्यानंतर डोळे दिपतात. तर काही व्हिडियो पाहिल्यानंतर आपले हसणे थांबत नाही. डिजिटल पेमेंटसंबधित एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तो प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केला आहे.
आनंद महिंद्रांची ट्विटरवर सकारात्मक सक्रियता
- महिंद्रा एंड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मिडियावर खूप सक्रिय असतात.
- त्यांच्या ट्वीट्सना खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो.
- त्यामुळे त्यांच्या ट्वीट्सवर रिट्वीट आणि लाइक्सचा पाऊस पडतो.
- आनंद महिंद्रा कधी गंभीर मुद्द्यावर ट्वीट करतात तर कधी मजेदार व्हिडिओ शेयर करून लोकांना हसण्यास भाग पाडतात. पण बहुतांशी ते सकारात्मक भूमिकेत असतात.
- त्यांनी एक मजेदार व्हिडिओ शेअर केला, त्यावर लोकं मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत.
- आता पर्यंत हा व्हिडिओ लाखोवेळा बघितला गेला आहे.
- त्या ट्वीटला कितीतरी हजार लाइक्स मिळाले आहेत.
बारकोडवर डिजिटल दान मिळणार का?
- आनंदा महिंद्रा यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत चांगला संदेश आहे.
- गावोगावी दान मागत फिरणाऱ्या एका वेगळ्या नंदाबैलाचं दर्शन घडलं.
- तसे तर हजारो असे बैल असतील, पण या बैलाचा ढंगच वेगळा आहे.
- दान करण्यासाठी या नंदी बैलाच्या माथ्यावर ‘फोन पे’ चा बारकोड लावला आहे.
- लोक त्या फोन पे बार कोडला स्कॅन करून दान करत आहेत.
- एकप्रकारे हा व्हिडिओ भारतात डिजिटल पेमेंटची वाढती लोकप्रियता दर्शवत आहे.
या व्हिडिओला स्वतः आनंद महिंद्रांनी ट्वीट करून सांगितलं- “भारतात झपाट्याने वाढणाऱ्या डिजिटल पेमेंटचं यश दाखवण्यासाठी याशिवाय दुसऱ्या कोणत्या उदाहरणाची गरज आहे का?”