मुक्तपीठ टीम
राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडक निर्बंध लावणार की लॉकडाऊन या संदर्भात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सर्वसामान्यांमध्ये दाखवली जात असल्याचं सांगत राज्य सरकारवर टोला लगावला आहे. यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
- “घाबरण्यापेक्षा आपण काळजी घेऊया.
- घाबरवणे हे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही.
- खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येते.
- पण परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिलं आहे.
- उद्याच्या मृत्यूला मी घाबरत नाही.
- त्यामुळे तेवढं धाडस आपण दाखवावे.
काय म्हणाले होते सोमय्या?
- “काही सत्ताधारी नेते स्वत:चं राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी करोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाउन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावे.
- ओमायक्रॉनच्या ९५ टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची खरी गरजच पडत नाहीय.
- दोन, तीन दिवसांमध्ये लोक बरी होतायत.
- खूप कमी लोक ज्यांना सहव्याधींचा त्रास आहे त्यांनी अधिक काळजी घ्यायची गरज आहे.