मुक्तपीठ टीम
देशातील प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मनाला डागण्या देणारी माहिती दिल्लीत जेरबंद झालेल्या सॉल्व्हर गँगच्या म्होरक्याने उघड केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून राज तेवतिया हा ही टोळी चालवतो. त्याचा देशातील ऑनलाइन परीक्षा पास करण्याचा धंदाच आहे. रशियन हॅकर्सच्या मदतीने तो कोणत्याही सिस्टीममध्ये घुसू शकतो, असा धक्कादायक गौप्यस्फोट त्याने केला आहे.
चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, २०१८ मध्ये तो हॅकर्सना भेटण्यासाठी रशियाला गेला होता. त्याच्या सांगण्यावरून २०२० मध्ये काही हॅकर्स भारतात आले आणि लॉकडाऊनमध्ये अडकले. त्याच्या उपस्थितीची माहिती पोलिसांना मिळाली.
राज तेतिया – ट्रॅव्हलचा धंदा ते सॉल्व्हर गँगचा म्होरक्या!
- फक्त बीए प्रथम वर्ष पास राज तेतिया सुरुवातीला टूर आणि ट्रॅव्हलमध्ये काम करायचा.
- लग्नानंतर पत्नीने ऑनलाइन परीक्षा दिली.
- त्यानंतर राजला ऑनलाइन परीक्षेत फसवणूक करण्याचा नवा काळाधंदा लक्षात आला.
- आरोपींनी काही ऑनलाइन परीक्षा केंद्रांवर हजेरी लावल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
- यानंतर, आरोपी २०१७ पासून ऑनलाइन परीक्षा फसवणुकीने उत्तीर्ण करण्याच्या धंद्यात उतरला.
- त्यासाठी आरोपीने त्याच्या मित्रासोबत आग्रा येथे ऑनलाइन परीक्षा केंद्र उघडले.
- यानंतर आरोपींनी जयपूर आणि कोटा येथे अशीच केंद्रे उघडली.
- त्यांच्या केंद्रांवर कॉपी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींच्या केंद्रांना काळ्या यादीत टाकण्यात आले.
- यानंतर त्यांनी इतर राज्यात नाव बदलून केंद्रे सुरू केली.
गर्लफ्रेंडमुळे मित्र झाले रशियन हॅकर्स!
- आरोपीने आपल्या मैत्रिणीच्या माध्यमातून रशियन हॅकर्सच्या संपर्कात आल्याचे उघड केले.
- तो एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रशियालाही गेला होता.
- तेथे त्याने भारतात होणारी ऑनलाइन परीक्षा हॅक करण्यासाठी यंत्रणा तयार करण्यास सांगितले.
- तेथून हॅकर्सशी बोलल्यानंतर त्यांना त्याने भारतातही आणले.
सर्वच ऑनलाइन परीक्षांमध्ये घुसखोरी?
- आरोपी राज तेवतियाचा दावा आहे की देशात अशी कोणतीचऑनलाइन परीक्षा असू शकत नाही ज्यात तो घुसखोरी करू शकत नाही. परीक्षेनुसार त्यांचे वेगवेगळे दर असायचे.
- त्याने एसएससी, सीएचएसएल, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, फॉरेस्ट डिपार्टमेंट गार्डची परीक्षा, रेल्वे ग्रुप-डी व्यतिरिक्त जेव्हीव्हीएनएल आणि इतर परीक्षांमध्ये घुसखोरी केली आहे.
- परीक्षा यंत्रणा चालवणाऱ्या लोकांनाही पोलिसांनी आपली यंत्रणा चांगली बनवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.