Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत टँकर माफियांची ३ हजार कोटींची बेकायदा उलाढाल!

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलारांची मुंबईतील टॅंकर माफियांवर कारवाईची मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ashish shelar on water tank

मुक्तपीठ टीम

मुंबईत टँकर माफियांची ३ हजार कोटींची बेकायदा उलाढाल असल्याचा दावा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलारांनी केला आहे. त्यांनी मुंबईतील टॅंकर माफियांवर कारवाईची मागणी केली आहे. मुंबई महापालिका समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी १८,००० कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित करते आहे त्यावेळी मुंबईत होणारी प्रचंड मोठी पाणी चोरी, टँकर माफीया आणि त्यातून होणारी अंदाजे ३,००० कोटींची बेकायदेशीर अनियंमित उलाढाल “हेही” एकदा तपासून पहा. ही चोरी रोखून, कारवाई करुन मुंबईकरांचा पैसा “पाण्यात” घालू नका, असे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रलिहून पालिका आयुक्त आणि भूजल आयुक्तांच्या लक्षात आणून दिले आहे.

 

पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रण आयुक्‍त सी.डी. जोशी यांच्‍याकडे पत्र लिहून भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईसह एमएमआर मधील पाणी चोरी व पाण्याचा होणारा बेसुमार उपसा याबाबत काही गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. तसेच यावर एस आय टी नियुक्त करुन चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.

 

मुंबईत १९ हजारांपेक्षा जास्त विहिरी, त्यातील साडेबारा हजार बोअरवेल! नियम नसल्याने लूट!!

  • केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई शहरात 19,000 पेक्षा जास्त पाण्याच्या विहिरी आहेत ज्यापैकी १२,५०० बोअरवेल आहेत.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेने २५१ जलकुंभांना नोटिसा बजावल्या असून त्यापैकी २१६ अवैध जलविहिरी असून यातील एकाच जलकुंभातून ८० कोटी रुपयांची पाणीचोरी झाल्याचेही बाब काही प्रसिध्‍दी माध्‍यमांनी समोर आणली आहे.
  • यावर कोणतेही नियमन किंवा कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे अवैध पाणी टँकर माफियांचे फावले असून मुंबई विभागात ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट करत असल्याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.
  • त्‍यामुळे मुंबईतील बेकायदेशीर व अनियंत्रित पाणी चोरीचा तपास करून त्‍यांना दंड आकारून ही चोरी थांबवणे आवश्‍यक आहे.
  • मुंबईच्या विद्यमान भूजल संसाधनाच्या वापराची क्षमता लक्षात घेऊन वैज्ञानिकदृष्ट्या अभ्‍यास करून पाणी वापराचे धोरण निर्धारित करणे अत्यावश्यक आहे.

 

म्‍हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेशातील अन्‍य नगरपालिकांच्या समन्वयाने त्वरित याबाबत एक एसआयटी कमिटी गठीत करून चौकशी होणे आवश्यक आहे.

 

ज्यांनी कोणत्याही परवानगी किंवा नियमांशिवाय भूजलाचा अतिरीक्त शोषण करीत पाणी उपसा केला आहे या प्रकरणी दोषी आढळतील अशांवर तातडीने एफआयआर दाखल करुन त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात यावी., मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाची विद्यमान भूजल क्षमता याचा अभ्‍यास करुन पाणी उपसा किती प्रमाणात झााला पाहिजे याचे धोरण निश्चित करण्‍यात यावे , तसेच मुंबई आणि मु्बई महानगरातील मैदाने, बागा यांसाठी लागणारे पाणी याची आवश्‍यकता लक्षात घेऊन आवश्‍यक असणारे पाणी उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणून सर्व महापालिकांनी स्‍वतःचे जलसंचयन धोरण ठरवून ते कार्यान्‍वयीत करण्‍याबाबत कार्यवाही करावी, अशा मागण्या आमदार अँड आशिष शेलार यांनी केल्या आहोत.

 

एकिकडे गारगाई धरणाचा प्रस्ताव रद्द करुन मुंबई महापालिका १८,००० कोटी खर्च करुन जेव्हा समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी खर्च करणार आहेत अशावेळी मुंबईत पाण्याचा “बाजार” करुन। सुमारे ३ हजार कोटींचे बेकायदेशीर रँकेट चालवले जात असून मुंबईकरांच्या पाण्याचा “व्यापार” कसा सुरू आहे याकडे आमदार अँड आशिष शेलार यांनी गंभीरतेने लक्ष वेधले आहे.


Tags: ashish shelarBJPmumbaiTanker Mafiaआशिष शेलारटँकर माफियाभाजपामुंबई
Previous Post

महाराणी छत्रपती सईबाई समाधीस्थळ परिसर विकासाचा आराखडा तयार करावा

Next Post

JEE, GMAT, लष्करी कोणत्याही परीक्षेच रशियन हॅकरच्या मदतीनं सेटिंग! सॉल्व्हर गँगचा गौप्यस्फोट!!

Next Post
solver gang members

JEE, GMAT, लष्करी कोणत्याही परीक्षेच रशियन हॅकरच्या मदतीनं सेटिंग! सॉल्व्हर गँगचा गौप्यस्फोट!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!