मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कला भारतात मात्र सरकारी परवानगी मिळवण्याआधीच ग्राहक जोडणे महाग पडले पडले आहे. मस्कच्या स्पेसएक्सच्या स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट कनेक्शनसाठी भारतीय ग्राहकांकडून प्रीबुकिंग केले. पाच हजारांपेक्षा जास्त भारतीय ग्राहकांनी पैसेही भरले. पण त्याआधी भारतात उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवण्यासाठीच्या आवश्यक सरकारी परवानगी त्यांनी घेतली नव्हती. त्यामुळे आता परवानगी मिळवण्यासाठी भारतातील ग्राहकांना सुमारे प्रत्येकी ७ हजार४०० रुपये परत करावे लागत आहेत.
स्टारलिंकला प्री-ऑर्डरचे पैसे का परत करावे लागले?
- स्टारलिंकने ब्रॉडबँड कनेक्शनची प्री-ऑर्डर केलेल्या भारतीय ग्राहकांना सांगितले आहे की, ‘आम्हाला परवाना मिळेपर्यंत प्री-ऑर्डर परत करण्याच्या सूचना दूरसंचार विभागाकडून मिळाल्या आहेत.’
- ज्या ग्राहकांनी स्टारलिंकच्या सॅटेलाइट ब्रॉडबँडची भारतात प्री-ऑर्डर केली आहे त्यांना कंपनीच्या वेबसाइटवर त्यांच्या खात्यांमध्ये लॉग इन करावे लागेल.
- रद्द करण्यासोबतच ते रिफंडची विनंती करतील.
रिफंड त्वरित जारी केला जाईल
- स्टारलिंकने आपल्या ग्राहकांना सांगितले की, रिफंड त्वरित जारी केला जाईल.
- मात्र, ते तुमच्या खात्यात दिसून येण्यासाठी १० दिवस लागू शकतात.
- मस्कची एरोस्पेस कंपनी स्पेसएक्सची एक युनिट स्टारलिंकला भारतात आपल्या उपकरणांसाठी आधीच ५,००० पेक्षा जास्त प्री-ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत.
- मात्र, कंपनीला अद्याप भारतात व्यावसायिक परवाना मिळालेला नाही आणि त्याशिवाय कंपनी देशात कोणतीही सेवा देऊ शकत नाही.
स्टारलिंक या वर्षी जानेवारीच्या अखेरीस भारतात व्यावसायिक परवान्यासाठी अर्ज करण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या कंट्री हेडने गेल्या महिन्यात सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली. कंपनीने या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत भारतात २००,०० कनेक्शनचे लक्ष्य ठेवले आहे.