मुक्तपीठ टीम
महिंद्रा म्हटलं की दणकट आणि आलिशान अशा एसयूव्हींची मालिकाच आठवते. देशातील या आघाडीवरील ऑटोमोबाइल कंपनीच्या स्कॉर्पिओ या मॉडलला गेली अनेक वर्षे भरभरून प्रेम मिळत आहे. आपल्या ग्राहकांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी महिंद्रा स्कॉर्पिओत आणखी आधुनिक बनवणारे बदल करत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी स्कॉर्पियन आणि स्कॉर्पियो स्टिंग या नावाने ट्रेडमार्क नोंदणीकृत केला होते. त्यामुळे ज्यामुळे कंपनी नवीन एसयूव्हीसाठी या दोन्ही नावांचा वापर करू शकते अशी अटकळ होती. पण नाव तेच ठेवत महिंद्र स्कार्पिओच्या अपडेटेड कारमध्ये सनरूफ सारखे लक्झरी फिचर्स मिळण्याची शक्यता आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओच्या अपडेटेड व्हर्जनमधील आधुनिक फिचर्स
- स्कॉर्पिओ २०२२ नेक्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, नवीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल, इंजिन स्टार्ट/ स्टॉप बटण आणि सनरूफसह ड्युअल टोन डॅशबोर्ड यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
- तसेच, हे वैशिष्ट्य केवळ या कारच्या टॉप व्हेरिएंटमध्येच पाहिले जाऊ शकतात.
- याशिवाय, स्कॉर्पिओ २०२२ मध्ये आतील भाग अधिक आकर्षक बनवण्यासाठी, डॅशबोर्डच्या उजव्या बाजूला सिल्व्हर अॅक्सेंटसह व्हर्टिकल एसी व्हेंट्स बसवण्यात आले आहेत.
- त्याच वेळी, नवीन अद्यतनित आगामी कारमध्ये अधिक केबिन जागा मिळू शकते.
कार इंजिन स्पेसिफिकेशन
- इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, या नवीन एसयूव्हीमध्ये २.२ लीटर क्षमतेचे एमएचएडब्ल्यूके डिझेल इंजिन वापरले जाऊ शकते.
- तसेच, असा अंदाज वर्तवला जात आहे की, महिंद्रा थारमध्ये वापरलेले २.० लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन कंपनी आपल्या नवीन एसयूव्हीमध्ये देखील वापरू शकते.
- कंपनीने इंजिनशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती अजून दिलेली नाही, त्यामुळे स्कॉर्पिओच्या चाहत्यांना अजून थोडी वाट पहावी लागेल.