मुक्तपीठ टीम
मुंबईत गेल्या १० दिवसांपासून कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या तिनपटीने वाढत आहे. यामुळे संपूर्ण मुंबईकरांची चिंता वाढली आहे. यासाठी मुंबई मनपा आता सज्ज झाली आहे. ओमायक्रॉनचे संकट तीनपटीने वाढ असून जुनी जम्बो कोरोना केंद्र कार्यरत करणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.दरम्यान, वांद्रे पश्चिम येथे करण्यात आलेली वांद्रे वंडरलँड रोषणाई पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने ती बंद करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
काय म्हणाल्या महापौर पेडणेकर?
- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, लहान मुलं बाधित होत आहेत, काळजी घेण्याची गरज आहे.
माणसांना वाचवण्यासाठी राज्य सरकार आणि आमचा प्रयत्न आहे. - कोरोना सेंटरच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू असून जुनी जम्बो कोरोना सेंटर कार्यरत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. - मात्र, नागरिकांनी काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले.
- कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मोठ्या रुग्णालयांऐवजी लहान रुग्णालयांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तिसरी लाट दोन लाटेपेक्षा भयानक असू शकते…
- काही लोकं बेशिस्तपणे वागत आहेत.
- लोकांनी मास्क घालावे असे आवाहनही महापौरांनी केले.
- ओमायक्रॉनचे संकट तीनपटीनं वाढत असून तिसरी लाट दोन लाटेपेक्षा भयानक असू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
- मास्क न वापरणे धोकादायक ठरू शकते असेही त्यांनी म्हटले.
- पंतप्रधानांनी सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून राज्यातही संचारबंदी सुरू झाली आहे.
- राज्याचेच मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान देखील बोलतायत नियम न पाळल्यास लॉकडाऊन करावं लागेल असेही त्यांनी म्हटले.
- लोकांनी यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरातूनच करावे असेही आवाहन महापौरांनी नागरिकांना केले आहे.
मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांकडून शिस्त मोडली
- मुंबईबाहेरून आलेली लोकं शिस्त बिघडवत आहेत
- मास्क न वापरण्यांविरोधात क्लीन-अप मार्शलकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत महापौरांनी म्हटले की, क्लीन-अप मार्शल यांनी मर्यादेत राहून काम करावे असेही त्यांनी म्हटले.
- सध्या क्लीन-अप मार्शल चांगले काम करत आहेत.
- लोकांनीदेखील आक्रमकतेपेक्षा संयम बाळगला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
- मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांकडून शिस्त मोडली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
- क्लीन-अप मार्शलने कारवाई केलेले बरेचजण हे मुंबई पाहण्यासाठी आलेले आहेत.
- त्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर व इतर नियमांचे पालन केल्यास क्लीन-अप मार्शलला कारवाईची संधीच मिळणार नसल्याचेही महापौरांनी म्हटले.