मुक्तपीठ टीम
कणकवलीत झालेल्या शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणें यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. यासंदर्भात केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी यावरून सरकारवर आरोप करत नितेश राणेंना सरकारकडून अटक करण्याची शक्यता दिसतेय असे सांगितले. पोलिसांनी नितेश राणेंना चौकशीसाठी २१ डिसेंबरला नोटीस बजावली होती. त्यानुसार नितीश राणेंची शनिवारी अर्धा तास चौकशी झाली. या प्रकरणातील एक आरोपी सचिन सातपुते याचा मोबाइल बंद असूनही पोलिसांनी त्याला दिल्लीतून जेरबंद केले, त्याचा राणेंशी असलेला ‘स्वाभिमानी’ संबंधच अटकेच्या भीतीमागे असल्याची चर्चा आहे.
संतोष परब हल्ला प्रकरण आहे तरी काय?
- सध्या सिंधुदुर्गात जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे.
- जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत शिवसेनेसोबत असल्याने राणेंशी त्यांचे वितुष्ट आहे.
- हल्ला झालेले संतोष परब हे सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत.
- १८ डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता.
- त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी चाकूने वार केले होते.
- या हल्ल्यात परब जखमी झाले होते. परबांनी थेट राणेंवर आरोप केला आहे.
- या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपाच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत.
- मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे.
- सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे.
- त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नितेश राणे यांची केली होती चौकशी
- नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामनामधून कठोर टीका त्यांच्यावर करण्यात आली होती.
- त्यावेळी पुण्यातील ‘सामना’ कार्यालय फोडण्याच्या आरोपामध्ये सचिन सातपुतेला अटक करण्यात आली होती.
- त्याला अटक होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव पोलिसांवर होता.
- नितेश राणे यांची पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली होती.
- अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, अशा तिघांनी पाऊण तास ही चौकशी केली.
- या चौकशीला आपण सर्वतोपरी सहकार्य केल्याचे राणे यांनी नंतर सांगितले.
सचिन सातपुते राणे समर्थक भाजपा पदाधिकारी!
- सातपुतेने भाजपाकडून लढवली होती पुणे महापालिकेची निवडणूक
- सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो.
- त्याने २०१७ मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक भाजपाकडून लढविली होती.
- संतोष परब यांच्यावर हल्ला केल्यानंतर सचिन सातपुतेचा फोन बंद करून होता.
- यापूर्वी या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
- नितेश राणे यांची याच प्रकरणी कणकवली पोलिसांनी चौकशीही केली आहे.
राणेंचा आघाडी सरकारवर राजकीय कारस्थानाचा आरोप
- संतोष परब हल्ला प्रकरणात राजकीय वर्तुळात जोरदार आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
- नितेश राणे यांनी त्यांची चौकशी सुरू करण्यामागे महाविकास आघाडी सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत सर्व जागांवर भाजपप्रणित पॅनेलचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
- सर्व उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
- भाजपला निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होण्याची आशा आहे.
- त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते मला नाहक शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
- ज्या दिशेने पोलीस चौकशी करत आहे, त्यावरून मला गोवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट होते.
- गेल्या २ वर्षांपासून राज्यात विरोधी पक्षनेत्यांवर खोट्या केसेस टाकून त्यांना गुंतविण्याचा प्रयत्न मविआकडून सुरु आहे.
- असाच अनुभव मला येत आहे, असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.
सुत्रधारांवर कारवाई करण्याची आमदार वैभव नाईकांची मागणी
- संतोष परब हल्ला प्रकरणाला जबाबदार असलेल्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
- परंतु मुख्य सुत्रधारापर्यंत पोलीस पोचत नाहीत.
- नितेश राणे व गोट्या सावंत यांचे स्टेटमेंट घेऊन त्यांना सोडण्यात आले.
- पोलिसांनी न घाबरता कारवाई केली पाहिजे.
- नितेश राणे आमदार आहे म्हणून किंवा केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून जर पोलीस कारवाई करायचे थांबत असतील तर शिवसेना आंदोलन करेल.
- शिवसेना उद्या कणकवली पोलीस स्थानकात जाऊन सुत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.