मुक्तपीठ टीम
जर तुम्ही पायलट आणि एअर होस्टेस असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली आकासा एअर उड्डाणासाठी सज्ज झाली आहे तर जेट एअरवेज नव्या अवतारात परतणार आहे. अशा स्थितीत दोन्ही विमान कंपन्यांनी भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे.
नागरी उड्डयन मंत्रालयाने ११ ऑक्टोबर रोजी भारतातील आकासा एअरच्या ऑपरेशन्ससाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मंजूर केले होते. यानंतर कंपनीने एओपीसाठी अर्ज केला. आकासा एअर एप्रिल २०२२ पर्यंत एअर ऑपरेटर्स परमिट (AOP) मिळवू शकते.आकासा एअरची २०२२ च्या उन्हाळ्यापासून विमानसेवा सुरू करण्याची योजना आहे. जेट एअरवेज २.० पुढील वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत ऑपरेशन सुरू करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, टाटा सन्स लिमिटेडच्या मालकीखाली आल्यानंतर एअर इंडियाही पुढील वर्षी नव्याने सुरू होऊ शकते.
देशात सध्या सुमारे १७,००० पायलट
- दीड दशकात प्रथमच विमान वाहतूक उद्योगात भरभराट होत असून पायलटची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.
भारतात सुमारे १७,००० वैमानिक आहेत. - पायलटचा प्रारंभिक पगार ८०,००० रुपये ते १.२ लाख रुपये प्रति महिना असतो आणि तो ६ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
पाहा व्हिडीओ: