मुक्तपीठ टीम
आता पर्यंतचे सर्व आयफोन हे ड्युअल सिमसह येत होते. एक सिम ई-सिम तर दुसरे फिजिकल सिम असायचे. परत चार्जिंगसाठीही इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळे पोर्ट असायचे. आता मात्र अॅपल आयफोन ई-सिमचे आयफोन बाजारात सादर करणार आहे. येत्या आयफोन १५ प्रो डिव्हाइसमध्ये फिजिकल सिमचा पर्याय काढून दोन्ही सिम ई-सिम असतील. तसेच USB टाइप-सी पोर्ट देखील जोडेल.
रिपोर्टनुसार, अॅपल आयफोन १५ प्रो डिव्हाइससोबत फिजिकल सिमचा पर्याय देणार नाही. या फोनमधील दोन्ही सिम ई-सिम असतील. येत्या दोन वर्षात अॅपल पूर्ण पदार्पण करेल. blogdoiphone अहवालात दावा केला आहे की आयफोन १५ प्रो मॉडेल फिजिकल सिम कार्ड स्लॉटशिवाय ऑफर केले जाईल. आयफोन १५ प्रोच्या मॉडेलमध्ये फक्त eSIM कार्डचा सपोर्ट असेल.
ई-सिम व्यतिरिक्त, आयफोन १५ प्रो मॉडेलमध्ये एक USB टाइप-सी पोर्ट देखील जोडेल आणि त्याचे आयकॉनिक लाइटनिंग पोर्ट काढून टाकेल. सध्या मार्केटमध्ये ९० टक्क्यांहून अधिक फोन आहेत ज्यामध्ये टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. नवीन आयफोन सह ३०W चे जलद चार्जिंग देखील उपलब्ध असू शकते किंवा यापेक्षा जास्त जलद चार्जिंगला सपोर्ट करेल. हे २०२३ iPhone मॉडेलसह पदार्पण करू शकते.
पाहा व्हिडीओ: