मुक्तपीठ टीम
देशात ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका दिवसात ओमायक्रॉनची १२२ प्रकरणे समोर आली आहेत. म्हणजेच एका तासात सरासरी ५ रुग्णांचे निदान होत आहे. एकीकडे कोरोना आणि ओमायक्रॉनचा कहर वाढत असतानाच केरळमधील कोरोना तज्ज्ञ सदस्य टीएस अनिश यांनी धक्कादायक अंदाज वर्तवला आहे.
कोरोना तज्ज्ञ सदस्य टीएस अनिश यांनी म्हटले आहे की जर आपण जगातील ओमायक्रॉनची वाढती संख्या पाहिली तर लक्षात येईल की २ ते ३ आठवड्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या हजारापर्यंत पोहोचेल. ते म्हणाले की हीच गती कायम राहिल्यास २ महिन्यांत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दहा लाखांवर पोहचण्याची भीती आहे. देशात मोठा उद्रेक होण्याचे थांबवण्यासाठी आपल्याकडे १ महिन्यापेक्षा जास्त वेळ नाही, असा इशारा त्यांनी दिला. हे थांबवायला हवे, असे त्यांनी आवर्जून बजावले.
फेब्रुवारीपर्यंत तिसरी लाट शिगेला पोहोचू शकते: भारतात ज्या वेगाने ओमायक्रॉनची वाढ होत आहे, ते पाहता, फेब्रुवारीमध्ये देशात ओमायक्रॉनचा स्फोट होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ओमायक्रॉन ३ फेब्रुवारीपर्यंत त्याच्या शिखरावर पोहोचू शकेल. राज्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, ही आकडेवारी भयावह आहेत.
राज्यांनूसार आकडेवारी
- महाराष्ट्र ८८
- दिल्ली ६७
- तेलंगणा ३८
- तामिळनाडू ३४
- कर्नाटक ३१
- गुजरात ३०
बूस्टर डोसचा विचार
सरकारच्या कोरोना तज्ज्ञ गट लसीच्या बूस्टर डोसच्या गरजेवर विचार करत आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की बूस्टर डोसच्या विविध पैलूंवर लक्ष दिले जात आहे. शास्त्रज्ञ डेटाचे पुनरावलोकन करत आहेत.