मुक्तपीठ टीम
विकृतांच्या चाळ्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांना अनेकदा त्रास होत असतो. अनेकदा तसे चाळे करणारे बहाणे देत महिलांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतात. असंच एक प्रकरण मुंबईच्या बेस्ट बसमध्ये घडलं होतं. एका विकृतानं सीटवर बसलेल्या महिलेशी लगट करत आपल्या गुप्तांगाच्या भागाचा तिच्या खांद्याला स्पर्श करत होता. तिने विरोध करताच तो पट्ट्याचा स्पर्श असल्याचं तो म्हणाला. अखेर त्याला चोप देत महिलेने पोलीस तक्रार केली. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी विनायकला सहा महिने सक्तमजुरीसह दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना २०१५ मधली आहे. महिला आपल्या वडिलांसोबत घरी जाण्यासाठी बेस्ट बसमधून प्रवास करत होती. पीडित महिलेने मध्य मुंबईच्या वरळी भागातून बस पकडली होती. बसमध्ये एका विकृतानं सीटवर बसलेल्या महिलेशी विकृत चाळे केले. पुरुषाच्या या वागण्याने व्यथित झालेल्या महिलेने वडिलांच्या मदतीने त्याला मारहाण करून बसमधून उतरवले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
न्यायालयाने ठोठावली शिक्षा
- न्यायालयाने ६ महिन्यांची शिक्षा सुनावली
- या प्रकरणी न्यायालयाने आरोपी विनायकला सहा महिने सक्तमजुरीसह दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
- त्यापैकी सात हजार रुपयांची नुकसान भरपाई पीडितेला देण्यात आली आहे.
- न्यायालयाने आरोपीच्या वकिलालाही फटकारले आहे.
- खरेतर, आरोपीच्या वकिलाने न्यायालयात उलट तपासणीदरम्यान सांगितले होते की, जर महिलेला आपला विनयभंग होत असल्याचे वाटत असेल तर तिने तिची जागा बदलायला हवी होती.
- ही अत्यंत घाणेरडी सूचना असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
- अखेर पीडितेने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाकडे दुर्लक्ष का करावे?
नेमकं काय घडलं?
- पीडितेनुसार, ५ नोव्हेंबर २०१५ रोजी दुपारी १.४० वाजता ती आणि तिचे वडील घरी जाण्यासाठी बसमध्ये चढले होते.
- आरोपी महिलेच्या सीटजवळ उभा होता आणि त्याने आपल्या गुप्तांगाचा भाग महिलेच्या खांद्यावर घासला.
- यावर महिलेने आक्षेप घेतल्यावर तिने हसून त्याने पट्टा घट्ट करत असल्याचे सांगितले.
- यानंतर महिलेने तिच्या वडिलांकडे तक्रार केली तसेच ड्रायव्हर आणि कंडक्टरला बस थांबवून बस सोडण्यास सांगितले.
- त्यानंतर पीडित महिला आणि तिचे वडील आरोपीला घेऊन दादर पोलिस ठाण्यात गेले.
स्वतंत्र साक्षीदार नसल्याचा युक्तिवाद फेटाळला!
- न्यायालयात खटला सुरू असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार नाही.
- ज्यावर न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात महिलेशिवाय हे कृत्य कोणीही पाहिलेले नाही. मुंबईसारख्या शहरात अनेकदा प्रवाशांची घाई असते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. अशा प्रकरणांमध्ये साक्ष देण्यास कोणीही सहजासहजी तयार होत नाही.