मुक्तपीठ टीम
फोल्डेबल फोनसारखे अनेक वेगळे प्रयोग स्मार्टफोनमध्ये करणारी सॅमसंग कंपनी नेहमीच चर्चेत असते. सॅमसंगने आता पुढील प्रीमियम फ्लॅगशिप एस२२ सीरिजमध्ये नवे स्मार्टफोन मॉडेल आणण्याचे ठरवले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस२२, सॅमसंग गॅलेक्सी एस२२ प्लस तसेच सॅमसंग गॅलेक्सी एस२२ अल्ट्रा हे मॉडेल लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. आता बेस मॉडेल सॅमसंग गॅलेक्सी एस२२ची एक कथित लाईव्ह इमेज ऑनलाइन लीक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वीबोवर लोकप्रिय टिपस्टर आईस युनिव्हर्सने सॅमसंग गॅलेक्सी एस२२ चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये फोनचा डिव्हाइस दिसत आहे. हा फोटो पाहता, डिवाइसची रचना गॅलेक्सी एस२१ सारखी आहे. आगामी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय, कंपनी १४ दशलक्ष सॅमसंग गॅलेक्सी एस२२ युनिट्स विकण्याची शक्यता आहे.
पॉवरफुल प्रोसेसर मिळण्याची शक्यता
- सॅमसंग गॅलेक्सी एस२२ स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा, स्नॅपड्रॅगन ८ जेन १ चिपसेट मिळू शकतो.
- याशिवाय एचडी डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सेल कॅमेरा आगामी डिवाइसमध्ये मिळू शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी एस२१ विषयीची माहिती
- सॅमसंगने या वर्षाच्या सुरुवातीला सॅमसंग गॅलेक्सी एस२१ लाँच केला होता.
- हा स्मार्टफोन अॅंड्रॉईड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
- या फोनची स्क्रीन ६.२ इंच आहे. त्याचे रिझोल्यूशन १०८०x२४०० पिक्सेल आहे.
- या डिवाइसमध्ये Exynos २१०० प्रोसेसर दिलेला आहे.
- या व्यतिरिक्त, स्मार्टफोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये १२-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, १२-मेगापिक्सेल सेकंडरी लेन्स आणि ६४-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आहेत.
- तर फोनमध्ये सेल्फीसाठी १० मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
पाहा व्हिडीओ: