मुक्तपीठ टीम
बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची दहशत पसरवणाऱ्या दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीमुळे आता राजकारण तापू लागले आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत आघाडीतील मंत्री होता असा आरोप केला होता. महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याच मुद्द्यावर शेलारांना आव्हान दिले आहे, नुसता आरोप करू नका. त्या पार्टीत कोण मंत्री होत, ते पुरावे देऊन सिद्ध करा, नाही तर मुंबईकरांची माफी मागा! महापौरांच्या या आव्हानानंतर तरी आमदार आशिष शेलार त्या मंत्र्याचे पुराव्यासह नाव उघड करणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
महापौरांनी इतरही मुद्द्यांवर आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही आमदार, मंत्री झाला तरी तुमचा मुंबई मनपात जीव कसा घुटमळतोय? आता जीव मोकळा कराच, असा टोलाही लगावला आहे.
महापौरांचा शेलारांवर जोरदार हल्ला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनावरून सर्वांना सातत्याने सतर्क राहण्यास सांगतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकात सर्वाधिक कोरोना असल्याने महाराष्ट्रालाही सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- मात्र, महाराष्ट्रातील भाजप नेते वेगळेच वागतात.
पार्टीतील मंत्री कोण? पुराव्यासह सांगा, नाही तर माफी मागा!
- बॉलिवूडच्या पार्टीत आघाडीचा मंत्री होता असा आरोप शेलार यांनी केला.
- कोण मंत्री त्या पार्टीत होता हे आशिष शेलारांनी स्पष्ट करावं.
- आशिष शेलार आणि इतर लोक बेछुट आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहे.
- तुमची ही कार्यपद्धती सर्वांना कळली आहे.
- तुम्ही काय करता ते जनतेला कळलं आहे. शेलारांना सांगायचं आमदार झाला, मंत्री झाला पण जीव मात्र अजूनही महापालिकेत का घुटमळत आहे?
- जर तुमचा जीव घुटमळत आहे. त्या जीवाला मोकळं करायचं असेल तर पुरावे देऊन आरोप सिद्ध करा.
- उगाच आरोप करू नका. लोकशाहीने अधिकार दिला म्हणून कसाही आरोप कराल हे चालणार नाही.
- संविधानाने दिलेल्या अधिकाराचा अपमान करू नका.
- तुमच्याकडे पुरावे असेल तर दाखवा. कोण तरी होता कोण होते. याचा पुराव्यासह सिद्ध करा!
भाजपाचे ८३ नगरसेवक करतात तरी काय?
- भाजपाचे नगरसेवक स्थायी समितीत बसतात.
- त्यावेळी ते काय करतात? त्या क्षणाला विरोध का करत नाही.
- ते अकार्यक्षम आहे का? त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का?
- तुमचे ८३ नगरसेवक अकार्यक्षम आणि तुम्हीच हुशार का?
- घोटाळ्याचे आरोप हवेत करू नका.
- स्वत: घोटाळे करता आणि दुसऱ्यावर आरोप करता हे आता बंद करा.
तुमच्या आरोपांनी खचणार नाही!
- सत्ता सर्वांनाच हवी असते. पण तुम्हाला तर हवीच हवी आहे.
- त्यामुळे तुम्ही कसेही हवी होत आहात.
- तुम्ही माझ्यावर शिंतोडे उडवले. मी ते बघेनच.
- मी नुसती बघणार नाही आमचा पक्ष, महिला आघाडी आणि सरकार बघून घेईल.
- तुमच्या घाणेरड्या पत्रव्यवहारांनी घाणेरड्या आरोपांनी खचून जाणारी किशोरी पेडणेकर नाही.
- शिवसेनेच्या रणरागिनी आहोत आम्ही.
महाराष्ट्राची माफी मागा!
- आता चॅलेंज आहे. तुम्ही जी एक पुडी सोडली आहे, आघाडीच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं काम तुम्ही केलं आहे.
- नक्की कोण आणि त्याचे पुरावे द्या. घोटाळ्याचे नुसते आरोप करू नका.
- नक्की कोण होता याचा उलगडा कराच नाही तर जनतेची माफी मागा. नुसतं बोलू नका!