मुक्तपीठ टीम
आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर ३ रुग्ण सातारा येथे आणि १ रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत. त्याचवेळी राज्यात दिवसभरात कोरोनाचे ८५४ नवे रुग्ण असल्याचे निदान झाले आहे, तर ८०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोना स्थिती ठळक मुद्द्यांमध्ये
- आज राज्यात ८५४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८०४ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९६,७३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७५,७०,९३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४८,६९४ (९.८४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ८०,०३९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात ८८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६,९४२ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –
- आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर ३ रुग्ण सातारा येथे आणि १ रुग्णपुणे मनपा क्षेत्रातील आहेत.
- आजपर्यंतराज्यात एकूण ४८ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णरिपोर्ट झाले आहेत. (मुंबई – १८, पिंपरी चिंचवड -१०,पुणे ग्रामीण- ६,पुणे मनपा -३, सातारा – ३, कल्याण डोंबिवली – २,उस्मानाबाद-२,बुलढाणा-१ नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरार -१).
- यापैकी २८ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या८ रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
- मुंबईचे ४ रुग्ण
- मुंबईतील चारही रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रुग्ण मुंबईतील आहे .
- इतर ३ रुग्ण छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील रहिवासी आहेत.
- यातील दोघांनी द. आफ्रिकेचा, एकाने टांझानियाचा तर एकाने इंग्लंडचा प्रवास केलेला आहे.
- हे चारही जण पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. सर्वजण सध्या विलगीकरणात आहेत.
- सातारा येथील ३ रुग्ण –
- हे पूर्व आफ्रिकेचा प्रवास केलेले एकाच कुटुंबातील सदस्य असून हे सर्वजण लक्षणेविरहित आणि विलगीकरणात आहेत. यातील ८ वर्षाची मुलगी वगळता इतर दोघांचे लसीकरण झालेले आहे.
- पुणे येथील एक रुग्ण हा आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशाचा निकटसहवासित असून १७ वर्षाच्या या मुलीला कोणतीही लक्षणे नाहीत. ती १८ वर्षाखालील असल्याने तिचे लसीकरण झालेले नाही.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
१७८७८ | १०३७९६ | १२१६७४ | १७८७८ | २६६८ | २०५४६ | ४५ | १६ | ६१ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५५१प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,४४७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२५६
- उ. महाराष्ट्र ०,०९५ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०४१
- कोकण ०,००६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,००९
नवे रुग्ण ०,८५४
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ८५४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४८,६९४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका २७४
- ठाणे १२
- ठाणे मनपा १९
- नवी मुंबई मनपा ५३
- कल्याण डोंबवली मनपा १९
- उल्हासनगर मनपा १
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ११
- पालघर १०
- वसईविरार मनपा १४
- रायगड १६
- पनवेल मनपा १८
- ठाणे मंडळ एकूण ४४७
- नाशिक १८
- नाशिक मनपा २४
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ४२
- अहमदनगर मनपा ८
- धुळे ०
- धुळे मनपा ३
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ९५
- पुणे ६८
- पुणे मनपा ९४
- पिंपरी चिंचवड मनपा ४४
- सोलापूर १०
- सोलापूर मनपा ०
- सातारा २०
- पुणे मंडळ एकूण २३६
- कोल्हापूर ३
- कोल्हापूर मनपा ६
- सांगली ८
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३
- सिंधुदुर्ग २
- रत्नागिरी ४
- कोल्हापूर मंडळ एकूण २६
- औरंगाबाद १०
- औरंगाबाद मनपा ४
- जालना ६
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २०
- लातूर ०
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद ७
- बीड १०
- नांदेड ०
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २१
- अकोला ०
- अकोला मनपा २
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ १
- बुलढाणा १
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ४
- नागपूर १
- नागपूर मनपा १
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया १
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली १
- नागपूर एकूण ५
एकूण ८५४
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
हा अहवाल १८ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.