मुक्तपीठ टीम
गरीबांसाठी असलेल्या स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळीच्या कारवाय मुंबई पोलिसांनी अन्न धान्य पुरवठा विभागाच्या मदतीने उघडकीस आणल्या आहेत. मुंबईतील गोरेगाव पूर्व आरे कॉलनी भागात आरे पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकला आहे. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्याप्रमाणात स्वस्त धान्याचा काळा बाजार सुरू होता. याच्याआधारे पोलिसांनी छापा टाकून २० जणांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या गोदामातून पोलिसांनी २५ लाखाचे धान्य जप्त केले आहे. त्यांच्यातील काहींचे राजकीय लागेबांधे असल्याचा आरोप केला जात आहे.
२५ लाखांचे धान्य जप्त!
- गोरेगाव परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात स्वस्त धान्य दुकानातील धान्य हे मुंबईच्या विविध भागांमध्ये अधिक दराने विकले जात होते.
- याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
- मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा आरे परिसरामध्ये असलेल्या एका गोदामावर स्वस्त धान्य वितरण विभागाच्या मदतीने छापा टाकला.
- या छाप्याममध्ये पाच ट्रकसह तब्बल २५ लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
- हा सर्व साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
२० जणांना ताब्यात घेतले
- दरम्यान या कारवाईमध्ये पोलिसांनी वीस जणांना ताब्यात घेतले आहे.
- घटनास्थळावरून २५ लाख रुपयांचा स्वस्त धान्याचा साठा, पाच ट्रक जप्त करण्यात आले आहेत.
- हा स्वस्त धान्याचा साठा नेमका कुठे -कुठे विक्रीला जाणार होता, याची आता आरोपींकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
- या आरोपींपैकी काही राजकीय लागेबांधे असल्याचा संशय आहे. त्याचीही चौकशी होत आहे.