मुक्तपीठ टीम
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वाड्याच्या मनस्वी मनोज पाटील आणि अन्य लेकींनी महिलांना कसं पाहिजे आदर्श गाव…ते मांडलं आहे. आपल्या गावात कोणत्या सुविधा पाहिजेत, गावाची रचना कशी असावी याच्या त्यांच्या डोक्यातील कल्पना मांडल्या.
मनस्वी मनोज पाटील आणि अन्य लेकींनी मांडलेलं आदर्श गाव
नमस्कार, आम्ही इथे आमच्या स्वप्नातलं गाव रेखाटलेलं आहे. त्याबद्दल मी सांगते. आम्ही त्याला ढिढोली म्हणून असे नाव दिले. इथे आमचा बसस्टॉप असेल. बस स्टॉपपासून एन्ट्री केल्यावर सरळ येताना झाडे लागतील. झाडांनंतर एक नदी लागेल त्या नदीच पाणी शेतीसाठी वापरलं जाईल. या पाण्याचा वापर उन्हाळ्यातही शेतीसाठी करता येईल त्यानंतर एक स्माशानभूमी आहे. स्मशानभूमी प्रत्येक गावांमध्ये असावी. यासाठी आमचा विचार आहे की, काही लोक वारल्यावर खडकावर वैगरे जाळतात, याचा पावसाळ्यात खूप त्रास होतो. यानंतर एक पाटीलपाडा लागतो. पाटीलपाड्यामध्ये एक दूधडेरी आहे. जेणेकरून गावकऱ्यांना दूध घेण्यासाठी किंवा जे पशुपालन करतात त्यांना दूध देण्यासाठी बाहेर जावे लागू नये म्हणून, दूधडेरी आहे.
गावातील प्रत्येक पाड्यामध्ये एक हॅंडपंप आहे. जेणेकरून त्या पाड्यातील लोकांना दुसऱ्या पाड्यामध्ये पाण्यासाठी किंवा लांब जावे लागू नये. त्याच पाड्यामध्ये आम्ही उपकेंद्र दाखवलेलं आहे. ज्यामुळे गावातील सर्व लोकांना त्या उपकेंद्रामध्ये आरोग्यसेवा घेता येतील. त्यासोबत त्याच पाड्यामध्ये आम्ही अंगणवाडी दाखवली आहे. पाडे जवळजवळ असल्यामुळे प्रत्येक पाड्यातील मुलं त्या अंगणवाडीत शिकण्यासाठी येऊ शकतील. त्यानंतर एक वारलीपाडा म्हणून दाखवला आहे. कारण गावामध्ये वेगवेगळ्या जातीचे समाज असतात आणि त्या समाजावरून तसे पाडे आणि त्याला नावे पडतात. यामुळे आम्ही पाड्यांची नावे नवी वेगळी दिलेली आहेत.
तिथेच एक रस्त्यालगत किराणा दुकान आहे. सोयीस्कर असे हे किराणा दुकान आहे. त्यासोबतच त्या पाड्यामध्येही पाण्याची सोय आहे. जिथे विहिर आहे. जिथे बोरवेल दाखवली आहे. त्यासोबतच त्या पाड्यामध्ये छोटसं मंदिर आहे. दत्ताचं मंदिर आहे असं मी दाखवते. नंतर आहे शाळा. शाळेच्या समोर आम्ही गतीरोधक दाखवले आहे जेणेकरून गाड्यावैगरे गतीने येतात. शाळेच्या बाजूला एक शौचालय आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किंवा घरोघरी ग्रामपंचायतीद्वारे बांधण्यात येतात. त्यानंतर त्या पाड्यामध्ये ग्रामपंचायतपण आहे.
ग्रामपंचायतसोबत किराणादुकान त्या पाड्यामध्ये आहे. एक मोठं दुकान आणि एक छोटं दुकान आहे. त्याच पाड्यामध्ये एक व्यायामशाळा म्हणजेच गावातील तरूण मंडळी असतील त्यांनी व्यायाम केलाच पाहिजे त्यासाठी ही व्यायामशाळा असेल. धन्यवाद