मुक्तपीठ टीम
या वर्षी भारतात मान्सून सर्वसामान्य असणार आहे. पावसाचे प्रमाण चांगल्या सरासरीनुसार असेल. म्हणजेच पाऊस चांगला बरसणार आहे. शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वांसाठीच ही चांगली बातमी आहे.
स्कायमेट या भारतातील अग्रगण्य हवामान कंपनीच्या अहवाल दिलासा देणारा आहे. भारतातील मान्सूनवर परिणाम घडवणारा अल निनोचा प्रभाव ओसरत आहे. प्रशांत महासागरात जास्त उष्णता नसून गारवा आहे. या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये पाऊस नेहमीच्या सरासरीनुसार असेल.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, २०२१ मध्ये सरासरी ८८०.६ मिमी पावसाच्या तुलनेत सामान्य पावसाची पातळी सरासरी ९६ टक्के ते १०४ टक्क्यांपर्यंत असेल, अशी अपेक्षा आहे.
“पॅसिफिक महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान कमी प्रमाणात आहे आणि ला निनाची स्थिती शिगेला पोहोचली आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान लवकरच खाली येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे ला निनाच्या परिस्थितीत बदल होईल. पावसाळा आल्यावर ते कमीतकमी ५० टक्क्यांपर्यंत असू शकते.
देशाच्या एकूण वार्षिक पावसाच्या सुमारे ६०% ते ९०% एवढा पाऊस दक्षिणेकडील तामिळनाडू वगळता वेगवेगळ्या राज्यात पडतो. तामिळनाडूमध्ये ३५% एवढाच पाऊस होतो.
स्कायमेट २०१२ पासून पावसाचा अंदाज जाहीर करत आहे. स्कायमेटने काही कारणास्तव २०२० मध्ये पावसाचा अंदाज जाहीर केला नाही. तथापि, २०२१ च्या मान्सूनच्या अंदाजाचा अहवाल जारी करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ: