मुक्तपीठ टीम
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचं निदान करण्याच्या चाचणीच्या शोधात भारताला मोठे यश मिळाले आहे. आता ओमायक्रॉनचा संसर्ग अवघ्या काही तासांत शोधला जाऊ शकतो. यासाठी, कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या डिब्रुगड विभागाने नवे ओमायक्रॉन टेस्टिंग किट तयार केले आहेत. हे किट ओमायक्रॉनची लागण झाली आहे की नाही याची माहिती अवघ्या २ तासात देऊ शकतील. सध्या जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे नवीन व्हेरिएंट्स शोध लावला जात आहे. ज्याला सुमारे ३ ते ४ दिवस लागतात आणि ते खूप महाग देखील आहे.
ओमायक्रॉन चाचणीसाठी किट ठरणार १००% प्रभावशाली
- आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांच्या टीमने हे टेस्टिंग किट बनवले आहे.
- या किटचे वैशिष्ट्य म्हणजे ओमायक्रॉन व्हेरिएंटमधील विशेष कृत्रिम जनुकाच्या तुकड्यावर त्याची चाचणी करण्यात आली. ज्याचा निकाल १००% बरोबर आहे.
- यासाठी किटचा विकास आवश्यक आहे कारण सध्या लक्ष्यित अनुक्रमासाठी ३६ तास आणि एकूण जीनोम क्रमवारीसाठी ४ ते ५ दिवस लागतात.
- त्याचवेळी, या किटसह, सामान्य स्वॅबच्या नमुन्यावरून ओमायक्रॉन त्वरित ओळखले जाईल.
किट मोठ्या प्रमाणावर कसे तयार होतील?
हे किट खाजगी आणि सरकारी भागीदारांसह तयार केले जाईल. आयसीएमआरने कोलकातास्थित कंपनी जीसीसी बायोटेकला ते बनवण्याचे कंत्राट दिले आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात ७ हजार ९९२ रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून जिल्हा स्तरावर कोरोनाच्या व्हेरिएंटवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही आठवड्यांत देशभरातील १० राज्यांतील २७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत.