मुक्तपीठ टीम
एसटी कर्मचाऱ्यांनी गेला एक महिना विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून संप पुकारला आहे. या संपात एकूण दहा हजार कामगारांना निलंबित करण्यात आले आहे. आता या निलंबित कर्मचाऱ्यांना आता सोमवार पर्यंत संधी देण्यात आली आहे. सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर आले तर त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असा शेवटचा अल्टिमेटम राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. तसेच सोमवारपर्यंत मेस्मा न लावण्याचा तूर्तास निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचं निलंबन मागे घेऊ
- परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी शुक्रवार पुन्हा चर्चा केली.
- त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधून ही माहिती दिली.
- आम्हाला कामावर यायचं आहे.
- पण काही लोक येऊ देत नाही असं काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
- कामगार कामावर यायला तयार आहेत.
- त्यामुळे त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
- जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचं निलंबन मागे घेऊ.
- जो डेपो ५० टक्के संख्येने सुरू होईल त्यांना तिथेच कामावर घेऊ.
- पण जिथे ही संख्या पूर्ण होत नाही.
- त्यांना बाजूच्या डेपोत सामावून घेतलं जाणार आहे.
- त्याबाबतचे लेखी आदेश काढणार आहोत.
तूर्तास मेस्मा न लावण्याचा निर्णय
- आम्ही कारवाईबाबत पुढे गेलो आहोत.
- सोमवार नंतर कठोर कारवाई होऊ शकते.
- सोमवारी निलंबित कामगारांनीही कामावर यावं.
- निलंबित झालेले नाही अशा कामगारांनीही कामावर यावं.
- मला संधी दिली नाही असं वाटू नये म्हणून त्यांना एक संधी देत आहोत.
- कामगारांना अडवलं गेलं तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी किंवा डेपो मॅनेजरला सांगावं.
- जेणे करून त्यांना पोलीस संरक्षण पुरवले जाईल.
- तूर्तास मेस्मा न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- मात्र, कामगार कामावर आले नाही तर त्याहूनही कठोर कारवाई केली जाईल.
आत्महत्या हा त्यावरचा पर्याय नाही
- आतापर्यंत एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
- रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
- तर काहींच्या बदल्या झाल्या आहेत.
- कोर्टाशिवाय प्रश्न सुटणार नाही हे कामगारांच्या लक्षात आलं आहे.
- कारवाई होईल का ही भीतीने ग्रासले आहे.
- अनेक कर्मचारी गटा गटाने आमच्याशी संपर्क साधला आहे.
- काही कर्मचाऱ्यांनी निलंबनाच्या भीतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
- काही आत्महत्यांची कारण वेगळी असू शकतात.
- आत्महत्येचा प्रयत्न याचा एसटीशी संबंध जोडला जात आहे.
- आत्महत्या हा त्यावरचा पर्याय नाही.
- तसेच एसटीच्या संपामुळे एसटीचे साडेपाचशे कोटींचं नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं.