मुक्तपीठ टीम
गुगलने युजर्ससाठी व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलिंगची सुविधा सुलभ केली आहे. आतापर्यंत व्हिडीओ कॉलिंगसाठी गुगल मीटवर अवलंबून राहावे लागत होते. पण आता व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलिंगचा पर्याय गुगलने जीमेल अॅपमध्येच दिला आहे. हे फीचर अँड्रॉइड तसेच आयओएस यूजर्ससाठी उपलब्ध आहे. या फिचरची घोषणा या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती. पण आता 6 डिसेंबरपासून, हे गुगल वर्कस्पेस, जी स्यूट आणि पर्सनल गुगल अकाउंट यासारख्या गुगल सेवांसाठी लागू करण्यात आले आहे.
गुगलच्या पर्यायांमध्ये आतापर्यंत करण्यात आलेले बदल
- यापूर्वी जीमेल अॅपवरूनही कॉलिंग करता येत होते. पण आता गुगल मीट व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कॉलसाठी वापरले जाते.
- यूजर्स थेट जीमेलवरून गुगल मीटचे इनव्हाइट पाठवू शकतात. यामुळे एकमेकांशी संवाद साधणे सोपे होईल.
- तुम्हाला जीमेलच्या समोर सर्वात वर गुगल मीटचा हा पर्याय दिसेल. ज्याच्या मदतीने यूजर्स थेट ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकतील.
- यासाठी यूजर्सना गुगल मीट अॅपला स्वतंत्रपणे भेट देण्याची गरज नाही.
जीमेला कम्यूनिकेशन सेंटर बनविण्यास होणार मदत
- गुगलच्या मते हा एक छोटासा बदल आहे. पण यामुळे जीमेलला त्यांच्या सर्व कम्युनिकेशन सर्व्हिसेसचे केंद्रीय हब बनवण्यात मदत होईल.
- सध्या, गुगल चॅट अॅपवरून कॉल केला असला तरीही तुम्हाला व्हिडीओ कॉलिंगसाठी जीमेल अॅपवर रीडायरेक्ट केले जाईल.
- गुगलच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरच्या योजनेअंतर्गत आता ईमेलद्वारे व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलिंग करता येणार आहे.
- चॅट, स्पेसेस गुगलची स्लॅक-स्टाईल मेसेजिंग सर्व्हिस आणि मीट व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सर्व्हिस यासह जीमेल अॅपच्या चार आवश्यक सर्व्हिसेसपैकी ही एक असेल.
- लॉकडाऊन कालावधीत, गुगल मीट सर्व्हिस व्हिडीओ कॉलिंगसाठी सुरू करण्यात आली होती, जी आता जीमेलसह एकत्रित केली गेली आहे.