मुक्तपीठ टीम
टपरीवरचा चहा हा चहाप्रेमींसाठी एक अमृततुल्य सुखचं. महाविद्यालय, ऑफिसमधून ब्रेक मिळाला की टपरीवरचा चहा प्यायला गर्दी जमते. त्यातही काही चहावाले आपल्या आपुलकीच्या गोडव्यानं चहाप्रेमींशी आपुलकीचे बंध जोडतात. असेच एक चहावाले म्हणजे दादर येथील केशवसुत पुलाखालील प्रसिद्ध बबन कांबळे यांची. बबन चहावाला एकेकाळी आपल्या चॉकलेट चहासाठी मुंबईत प्रसिद्ध होते. विशिष्ट सुगंध आणि चव असलेला बबन यांचा चॉकलेट चहा पिण्यासाठी राजकीय, सामाजिक, सिने, नाट्य, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील मंडळी खास दादरला येत असतात. मात्र असं असताना दादर येथील लोकमान्य टिळक उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात तीन ते चार बांधकामे अडथळा ठरत आहेत, त्यात बबन चहावाला यांचे दुकान अधिक घरदेखील आहे. एवढ्या वर्षांची परंपरा असणाऱ्या बबन यांचा हक्क डावलत त्यांची जागा अनधिकृत ठरवली जात आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्याने त्यांना दुकानासाठी दादरमध्ये जागा मिळणे आवश्यक आहे. शिवसेनेसारखा मराठी माणसांसाठी लढण्याचा दावा करणारा पक्ष मनपात सत्तेत असल्याने या मराठी माणसाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा चहाप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
टीळक पुलाचा विकास, बबन चहावाल्याचा का विनाश?
- दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा मुंबईतील महत्त्वाचा पूल आहे.
- बांधकामाला अनेक दशके उलटल्याने त्याची पुनर्बांधणी आवश्यक आहे.
- येत्या काळात त्याची आधुनिक पद्धतीने उभारणी केली जाणार आहे.
- यासाठी सुमारे ३७५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
- पुलाखालील हिंदू कॉलनीच्या पहिल्या गल्लीजवळ लखमशी नप्पू मार्गावरील तीन ते चार बांधकामे या पुलाच्या रुंदीकरणाआड येत असल्याचे स्पष्ट करत ती हटवण्यासाठी मनपाने नोटिसा पाठवल्या आहेत.
- या बांधकामांमध्ये एक १५० चौरस फुटांचे स्टेशनरीचे दुकान अधिक घर असून ते प्रसिद्ध बबन चहावाला यांचे आहे.
बबन चहावाल्यांच्या घर-दुकानाला नोटीस का?
- बबन यांना मनपाच्या माटुंगा एफ उत्तर विभाग कार्यालयाने हे बांधकाम अवैध असून ते संरक्षित असल्यास १५ दिवसांत योग्य ती कागदपत्रे घेऊन संपर्क साधण्यास कळवले आहे.
- बांधकामासंबंधी बबन यांच्याकडे १९५३ पासूनचे पुरावे आहेत.
- गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ मनपाला भरलेल्या मालमत्ता कराच्या पावत्या तसेच अन्य कागदपत्रे सादर केली आहेत.
- पुरावे दिल्यानंतर मनपाने पुन्हा त्यांच्याशी संपर्क केलेला नाही, या दुकानावर पत्नी आणि मुलांसह चौघांचा उदरनिर्वाह चालतो.
- हे बांधकाम हटवले जाणार असल्यास मला दादरमध्येच दुकानासाठी पर्यायी जागा मिळायला हवी, अशी मागणी बबन कांबळे यांनी सांगितले .
अधिकृत बांधकामेही संकटात
- दादरचा टिळक पूल नव्याने बांधला जाणार आहे.
- त्यामुळे अधिकृत बांधकामेही संकटात आहेत.
- एकेकाळी दादर स्टेशनच्या बाहेर चहाचा व्यवसाय करणारे व पत्रकारितेतील अनेक लोकांचे लाडके असलेले प्रख्यात चहावाले बबनराव कांबळे यांचे अधिकृत दुकानही टिळक ब्रीजच्या कामामुळे संकटात आले आहे.
- नाना पाटेकरांसारख्या महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात व्यक्तीही बबन कांबळेंच्या चहाचे चाहते आहेत.
- त्यांना दुकानाची पर्यायी जागा दादरमध्येच मिळायला हवी, अशी चहाप्रेमींची मागणी आहे.
- शिवसेनेसारखा मराठी माणसांसाठी लढण्याचा दावा करणारा पक्ष मनपात सत्तेत असल्याने या मराठी माणसाला न्याय मिळेल, अशी चहाप्रेमींना अपेक्षा आहे.