मुक्तपीठ टीम
शेतकऱ्यांना बटाट्यांच्या पेटंटचा गैरवापर करत खटल्यांमध्ये लढवत ठेवणाऱ्या पेप्सिको या बहुराष्ट्रीय कंपनीला शेतकऱ्यांनी महादणका दिला आहे. यात सर्वात मोठा वाटा हा ऑथोरिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राइट्सचा आहे. कविता कुरुगंटी यांनी संस्थेच्यावतीने त्यांच्या याचिकेत पेप्सिकोला दिलेले पेटंट सार्वजनिक हिताच्या विरुद्ध असल्याचे म्हटले होते. त्यावर निकाल देताना PPV&FRA ने देखील कविता कुरुगंटी यांच्या याचिकेवर शिक्कामोर्तब केले.
PEPSICO बटाट्याच्या FL-2027 या जातीचा वापर आपल्या Lay ब्रँडच्या पॅकेज केलेल्या चिप्स बनवण्यासाठी करते. FL-2027 जातीची पेप्सिकोने 2016 मध्ये नोंदणी केली होती. त्यामुळे पेप्सिकोने परवानगी दिलेले निवडक शेतकरीच या वाणाची लागवड करू शकत होते.
त्यांच्याशिवाय, इतर कोणताही शेतकरी हे वाण लावू शकत नव्हता. आता मात्र तसं बंधन राहिलेलं नाही.
कविता कुरुगंटींची शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीची ‘बटाटा’ लढाई!
- अॅथोरिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राइट्सच्या कविता कुरुगंटी यांनी त्यांच्या याचिकेत पेप्सिकोला दिलेले पेटंट सार्वजनिक हिताच्या विरुद्ध असल्याचे म्हटले होते.
- चुकीच्या माहितीच्या आधारे हे पेटंट पेप्सिको इंडियाला देण्यात आल्याचे या याचिकेत म्हटले आहे.
- याचिकेनुसार, ‘FL-2027’ या बटाट्याच्या जातीला दिलेला बौद्धिक संपदा अधिकार म्हणजेच IPRनोंदणीच्या विहित तरतुदींनुसार नाही, असा दावा करण्यात आला होता.
- PPV&FRA ने देखील कविता कुरुगंटी यांच्या याचिकेवर शिक्कामोर्तब केले. निबंधकांनी पेप्सिकोला पेटंट प्रमाणपत्र जारी केल्याबद्दल प्राधिकरणाने आश्चर्य व्यक्त करत ते तत्काळ रद्द केले.
- निकालात, पीपीव्ही आणि एफआरएने रजिस्ट्रारवर नाराजी व्यक्त केली की शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षक असूनही त्यांनी तरतुदींचे उल्लंघन केले.
- त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. PPV&FRA ही एक वैधानिक संस्था आहे. वनस्पती जाती आणि शेतकरी हक्क कायदा, २००१ अंतर्गत त्याची स्थापना करण्यात आली आहे.
- ही संस्था वनस्पतींच्या वाणांच्या संरक्षणासाठी आणि शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी काम करते.
- त्यांच्या लढाईमुळे ३० महिन्यांच्या सुनावणीनंतर या प्रकरणाचा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने आला.
शेतकरी पेप्सिकोविरोधात आक्रोश का?
- पेप्सिको बटाट्याच्या FL-2027 या वाणाचा वापर आपल्या Lay ब्रँडच्या पॅकेज केलेल्या चिप्स बनवण्यासाठी करते.
- हे वाण चिप्ससाठी चांगले मानले जाते.
- FL-2027 वाणाची पेप्सिकोने २०१६ मध्ये नोंदणी केली होती.
- याचा अर्थ असा आहे की कंपनीला अधिकार आहे की केवळ निवडक शेतकरी या वाणाची लागवड करू शकत होते.
- त्यांच्याशिवाय, इतर कोणताही शेतकरी हे वाण वापरू शकत नव्हते.
- पेटंट झाल्यानंतर, FL-2027 बटाटा देशभरात फक्त पेप्सिकोसाठी पिकवला गेला.
- आतापर्यंत १२ हजार शेतकरी या जातीच्या बटाट्याची लागवड करत होते.
- कंपनीने त्याच्याशी करार केला होता.
पेप्सिकोने शेतकऱ्यांकडून दीड कोटींची भरपाईही मागितली होती!
- पेप्सिकोने या वाणाचे बटाटा बियाणे वाढवल्याबद्दल गुजरातमधील चार शेतकऱ्यांसह एकूण नऊ शेतकऱ्यांवर खटला भरला.
- पेप्सिकोने २०१८ आणि २०१९ मध्ये शेतकऱ्यांवर खटले दाखल केले गेले, तेव्हा वाद सुरू झाला.
- पेप्सिकोनेही या शेतकऱ्यांकडे दीड कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
- २०१९ मध्ये, कविता कुरुगंटी यांनी PPV&FRA मध्ये PEPSICO विरुद्ध याचिका दाखल केली. त्यावेळी पेप्सिकोने केस मागे घेतली, पण इतर शेतकऱ्यांना हे वाण पिकवू दिले नाही.
- सुमारे अडीच वर्षे चाललेल्या या प्रकरणात आता शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला आहे.
- ३० महिन्यांच्या सुनावणीनंतर या प्रकरणाचा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने आला.
कोणत्या कारणामुळे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले?
- याचिकेनुसार, पेप्सिको इंडियाला बटाट्याच्या वाणाची मिळालेली बौद्धिक संपदा हक्कांची नोंदणी दिलेल्या नियमांनुसार नव्हती.
- ती जनहिताच्या विरोधात असल्याचे याचिकेत दावा होता.
- प्राधिकरणाने याचिकाकर्त्याला सहमती दर्शवत निबंधकांचे प्रमाणपत्र जारी केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि तत्काळ नोंदणी रद्द केली.
- या निर्णयात प्राधिकरणानेही निबंधकांवर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांच्या हक्काचे रक्षक असूनही त्यांनी नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना व इतरांना त्रास दिल्याचे म्हटले आहे.
- प्राधिकरणाने निबंधकांना नियमानुसार वनस्पती जातींच्या नोंदणीसाठी अर्जाचे मूल्यमापन करण्यासाठी प्रमाणित पत्रक तयार करण्याचे निर्देश दिले.