मुक्तपीठ टीम
हिवाळ्याच्या हंगामात कांद्याचे भाव वाढले असतानाही, सोलापूरमधील एका शेतकऱ्याने १,१२३ किलो कांदा विकून केवळ १३ रुपये कमवले. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या १३ रूपयामधून सरकारचे १३ वा घालावे का ? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
सोलापूर येथील कमिशन एजंटने दिलेल्या विक्री पावतीत, बापू कावडे या शेतकऱ्याने १,१२३ किलो कांदा बाजारात पाठवला आणि त्या बदल्यात त्याला फक्त १,६६५.५० रुपये मिळाले. यामध्ये मजुरीचा खर्च, वजनाचे शुल्क आणि शेतातून कमिशन एजंटच्या दुकानात माल हलवण्याचा वाहतूक खर्च समाविष्ट आहे तर उत्पादन खर्च १,६५१.९८ रुपये आहे. याचा अर्थ शेतकऱ्याला केवळ १३ रुपये मिळाले.
या १३ रूपयामधून सरकारचे १३ वा घालावे का ?
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल बापू कावडे या शेतकर्यांने २४ पोते कांदे रूद्रेश पाटील या व्यापा-याला विक्री केले. जवळपास ११२३ किलो कांदे विकून pic.twitter.com/ZergTblfF0
— Raju Shetti (@rajushetti) December 2, 2021
कवाडे यांच्या विक्रीची पावती ट्विट करत राजू शेट्टी यांनी सरकरावर निशाणा साधला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल बापू कावडे या शेतकर्यांने २४ पोते कांदे रूद्रेश पाटील या व्यापा-याला विक्री केले. जवळपास ११२३ किलो कांदे विकून या माझ्या बळीराजाला १६६५ रूपये मिळाले. हमाली , तोलाई , मोटार भाडे वजा जाता १३ रूपये बापू कावडे या शेतक-यास शिल्लक राहिले. या १३ रूपयामधून सरकारचे १३ वा घालावे का ? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
या माझ्या बळीराजाला १६६५ रूपये मिळाले. हमाली , तोलाई , मोटार भाडे वजा जाता १३ रूपये बापू कावडे या शेतक-यास शिल्लक राहिले.
या १३ रूपयामधून सरकारचे १३ वा घालावे का ?@narendramodi @PMOIndia @ANI @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dadajibhuse @nstomar @PawarSpeaks @PiyushGoyal
— Raju Shetti (@rajushetti) December 2, 2021