Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मनपा सेवेतील डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस बंद करण्याची मागणी!

वरळीच्या मुलाच्या मृत्यूनंतर नगरसेवक, प्रशासन खडबडून जागे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Demand to stop pvt practices of bmc doctors

मुक्तपीठ टीम

वरळीतील सिलिंडर ब्लास्ट घटनेतील जखमी चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू हा मनपाच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच झाला असा आरोप भाजपाने केला आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाने रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तर रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मुंबई मनपा वेतन देते, तरीही ते उपचार करण्याकडे डॉक्टर लक्ष देत नाहीत, तर खासगीत जास्त लक्ष देतात, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे मनपा सेवेतील डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस बंद करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.

डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसवर बंदी घालावी, जेणेकरून मुंबई मनपाच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार मिळू शकतील. मुंबई मनपाचे विरोधी पक्षनेते रवी राजा म्हणाले की, दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मनपा रुग्णालयांमध्ये असा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.

 

‘स्थायी समितीत संताप

  • तत्पूर्वी, भाजपा नगरसेवकांनी नायर रुग्णालयाला भेट देऊन अचानक पाहणी केली, त्यात बहुतांश एचओडी ओपीडीतून गैरहजर होते.
  • याचा निषेध करत भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीची सभा तहकूब करण्याची मागणी केली.
  • सभा सुरू होताच सभागृह नेत्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी नायरच्या मुद्द्यावरून सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला.
  • त्यानंतर या विषयावर चर्चा झाली.
  • अशा निष्काळजीपणामुळे मनपाची प्रतिष्ठा मलिन होतेय, असे राऊत म्हणाल्या. दोषींना शिक्षा झाली पाहिजे.
  • रवी राजा म्हणाले की, अशी घटना पहिल्यांदाच समोर येत नाहीये.
  • यापूर्वीही मनपा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
  • मनपा आयुक्त अशा लोकांवर कडक कारवाई का करत नाहीत?
  • नायर रुग्णालयातील दोषींवर फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करावी.

 

शिवसेनेला फक्त पेंग्विन दिसतात!

  • त्यांना फक्त पेंग्विन दिसतात, असे म्हणत भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेवर ताशेरे ओढले. पेंग्विनच्या संगोपनावर दररोज दीड लाख रुपये खर्च केले जात आहेत, मात्र एका बालकाचा मृत्यू होत असून त्याला आर्थिक मदत देण्याबाबत कोणीही बोलत नाही.
  • निष्काळजीपणामुळे ज्या कुटुंबाच्या मुलाचा मृत्यू झाला, त्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष किंवा कोणताही नेता गेला नाही. मनपा दरवर्षी आरोग्य सेवेवर ४५०० कोटी रुपये खर्च करते, मात्र रुग्णालयांचे वास्तव हेच आहे.

 

याबाबत स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांनी चिंता व्यक्त केली. पालिकेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल स्थायी समितीसमोर मांडावा, असे ते म्हणाले.


Tags: BJPBMCCylinder BlastShivsenaworliभाजपामुंबई मनपावरळीशिवसेनासिलिंडर ब्लास्ट
Previous Post

KPMG’s 22nd Annual Global Automotive Executive Survey 2021

Next Post

शेतकऱ्याने विकले अकराशे किलो कांदे, कमाई फक्त १३ रुपये! राजू शेट्टी म्हणतात सरकारचे तेरावं घालायचं का?

Next Post
raju shetti

शेतकऱ्याने विकले अकराशे किलो कांदे, कमाई फक्त १३ रुपये! राजू शेट्टी म्हणतात सरकारचे तेरावं घालायचं का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!