मुक्तपीठ टीम
केज तालुक्यातील नांदूरघाट येथे मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांचे मागील तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. नांदूरघाट गटात विकास कामाच्या नावावर झालेल्या जवळपास ८५ कोटी रुपयांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमावी, नांदूरघाट येथे पाणी पुरवठा सुरू करावा, शिरूरघाट येथे पाणी पुरवठा योजनेची चौकशी करावी, नांदूरघाट ग्रामपंचायत मार्फत झालेल्या कामाची चौकशी करावी, खाडेवाडी व खोमणेवाडी येथे स्वतंत्र मतदान केंद्र द्यावे. नांदूरघाट गटातील अनेक रस्त्यांचा समावेश जिल्हा विकास आराखड्यात करून त्या रस्त्याना इतर जिल्हा मार्ग क्रमांक द्यावा यासह नांदूरघाट गटातील महत्त्वाच्या विषयासाठी मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस हे नांदूरघाट येथे २९ नोव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलनास बसले होते.
नांदूरघाट येथे सुमंत धस यांच्या अन्नत्याग आंदोलनास आंदोलन नांदूरघाट गावातील व गटातील नागरिक पाठिंबा देत आहेत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केज तालुका, वंचित बहुजन आघाडी,लहुजी शक्ती सेना केज तालुका,आदी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर,पत्रकार अमोल जाधव,श्रीकांत जाधव,जेष्ट पत्रकार अशोक तारळकर,संजय नवले, शिवाजी जाधव, धनंजय रणदिवे, तुकाराम जाधव, शेख बाबूभाई, माजी मुख्यध्यापक संभाजी हंगे यांच्या सह सर्वसामान्य नागरिकांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन पाठिंबा दर्शवला होता. तहसीलदार व पंचायत समितीचे गट विकास अधिकारीयांच्या लेखी आश्वासनानंतर सुमंत धस यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.
आंदोलन दरम्यान मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष श्री सुमंत धस ह्यांचा रक्तदाब खालावला, नांदूरघाट सरकारी रुग्णालयात उपचार सुरू…
काळजी घ्या @sumant_dhas pic.twitter.com/Q7FrDOwmli
— MNS Report | मनसे रिपोर्ट (@mnsreport9) December 2, 2021
तीन दिवस आंदोलन केल्या मुळे सुमंत धस यांची प्रकृती खलावली होती,अन्नत्याग आंदोलना मुळे सुमंत धस यांचा रक्तदाब नव्वद बाय साथ ने कमी झाला होता त्या मुळे त्यांना उपचारा साठी नांदूरघाट ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. दोन दिवसाच्या उपचारा नंतर त्यांची प्रकृती आता ठीक असून त्यांना डीचार्ज देण्यात आला आहे.