मुक्तपीठ टीम
बिग बी अमिताभ बच्चन यांची मुंबईतील प्रतिक्षा बंगल्याची भिंत चर्चेत आहे. रस्ते रुंदीकरणामध्ये प्रतिक्षा बंगल्याची भिंत अडचण ठरतेय. मुंबई मनपाने रस्ते रुंदीकरणासाठी नेमकी कोणती पावले उचलली याचा चार आठवड्यांमध्ये अहवाल सादर करावा असा आदेश लोकायुक्तांनी दिला आहे. रस्ते रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याच्या भिंतीचा काही भाग तोडणे हा गरजेचा असल्याचा अहवाला सिटी सर्वे अधिकाऱ्यांनी जुलैमध्येच दिला होता.
मुंबई मनपाला लोकायुक्तांचे आदेश
- अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत रस्ते रुंदीकरणासाठी अडसर ठरत आहे, रस्ते रुंदीकरणासाठी २०१९ मध्ये मनपाने प्रतिक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली होती.
- पण अमिताभ यांच्या बंगल्यावर अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही, याबाबत काँग्रेसनं लोकायुक्तांकडे धाव घेत तक्रार केली होती.
- मुंबई मनपानं रस्ते रुंदीकरणासाठी कोणती पावलं उचलली, याचा चार आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
- नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांच्या अर्जावर लोकायुक्तांची सुनावणी पार पडली.
- मुंबईनं अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याच्या भिंतीसंदर्भात काय अॅक्शन घेतलीय याची माहिती लोकायुक्तांनी मागवली आहे.
- २०१७ पासून अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला नोटीस देण्यात आली आहे.
- रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये प्रतिक्षा बंगल्याची भिंत येत असल्यानं, ही भिंत हटवण्याबाबतची ही नोटीस आहे.
- मात्र, २०१७ पासून प्रतिक्षा बंगल्यासंदर्भात मनपानं कोणतीही कारवाई केली नाही.
- मनपानं दिलेल्या नोटीसनुसार, कारवाई करत नाही, याबाबत नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी लोकायुर्कांकडे अर्ज केला होता.
का तोडायची आहे अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याची भिंत?
- मुंबईतील जुहू इथल्या संत ज्ञानेश्वर मार्ग रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकाने आजू बाजूच्या सर्व इमारती आणि बंगल्यांच्या मालकांना त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती.
- बहुतांश भूखंड मालकांनी प्रतिसाद दिला.
- मात्र अमिताभ बच्चन यांनी यावर कोणतही उत्तर मुंबई मनपाला दिले नाही.
- दरम्यान २०१९ मध्ये मनपाने प्रतिक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली गेली.
- पण अमिताभ यांच्या बंगल्यावर अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही.
- प्रतिक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या इमारतींवर रस्ता रुंदीकरणाच्या नावाने मुंबई मनपाने भिंती तोडण्याची कारवाई केली होती.
- मात्र त्यानंतर त्या इमारतींमधील लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती.
- त्यांनी म्हटलं होतं की, आमच्या इमारती बाहेर असलेल्या भिंतीवर तोडक कारवाई झाली.
- मात्र शेजारच्या अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांच्या भिंतींवर कोणतीही कारवाई नाही झाली.