मुक्तपीठ टीम
भारतीय संविधान हाच भारतीय नागरिकांचा खरा धर्मग्रंथ असून भारताला राष्ट्र म्हणून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, न्याय,बंधुता,धर्मनिरपेक्षता,वै ज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रवाद,राष्ट्रीय एकात्मता हे संविधानिक मूल्य विचारच तारणहार असून विद्यार्थी दसेपासूनच ह्या मूल्यांचा संस्कार आणि आचरणाचे धडे देण्यासाठी भारतीय संविधान हा स्वतंत्र विषय म्हणून शाळा महाविद्यालयाततून शिकविला जावा असे मत संविधान साक्षरता अभियान व अध्यापकभारती चे प्रवर्तक शरद शेजवळ यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय संविधान दिनानिम्मित संविधान साक्षरता अभियान व अध्यापकभारती च्या वतीने संविधान सामान्यज्ञान परीक्षा २०२१ चे आयोजन येथील स्व.बी.पी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स,डेल्टा क्लास पिंपळगाव बसवंत व संधान क्लासेस येथे महेंद्र गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी संविधान चाचणी परीक्षा घेण्यात आली.
पिंपळगांव बसवंतच्या इतिहासात शरद शेजवळ व महेंद्र गायकवाड यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या संविधान सामान्यज्ञान चाचणीत विध्यार्थ्यांनचा विक्रमी ९०० विद्यार्थांनी सहभाग घेतला अशी माहिती महेंद्र गायकवाड यांनी दिली.
संविधान अभिवादन सभा व पारितोषिक वितरण शरद विमल दिनकर शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली व महेंद्र गायकवाड सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी प्राचार्य.प्रकाश भंडारे,उपप्राचार्य चंद्रकांत नायकवाडे,प्रा.हिना शेख ,प्रा.नीलम जगताप,प्रा.दीपाली लोखंडे,प्रा.प्रियांका शिंदे,प्रा.सचिन बिडवे,प्रा.संधान सर इ.परिश्रम घेतले.प्रा.अभिजित अहिरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सूत्रसंचालन तन्वी संधान,चेतना पुंड यांनी केले.