Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उपचार न केलेल्या एचआयव्ही-एड्स रुग्णांपासून कोरोनाचा नवा व्हेरिएंट विकसित झाल्याची शक्यता! ब्रिटनने सहा देशांची विमानं रोखली!

November 26, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. यामुळे जगभर कमालीची सावधगिरी बाळगली जात आहे. कोरोनातून जग सावरत असतानाच युरोपातील देशांमध्ये पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं. त्यात आता कोरोनाच्या या नवीन प्रकारामुळे घबराट पसरली आहे. ब्रिटनने सहा आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारतात सध्या तरी अशी बंदी नसून कडक लक्ष ठेवले जात असून चाचण्या केल्या जात आहेत. जागतिक माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांनुसार, तज्ज्ञांच्या मते उपचार न केलेल्या एचआयव्ही-एड्स रुग्णापासून हा नवा व्हेरिएंट विकसित झाला असावा, अशी शक्यता आहे.

 

दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या नवीन प्रकारातून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची बातमी समोर आल्यानंतर जगातील अनेक देशांनी अलर्ट जारी केला आहे. ब्रिटनने गुरुवारी सहा आफ्रिकन देशांमधून येणारी उड्डाणे तात्पुरती स्थगित केली. त्या देशाचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी माध्यमांनी ही माहिती दिली.

 

नव्या व्हेरिएंटमुळे अनेक बदलांची भीती!

  • कोरोनाचा B.1.1.529 हा नवा प्रकार तीसपेक्षा जास्त उत्परिवर्तनांसह दक्षिण आफ्रिकेत पसरत आहे.
  • यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या मते, या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात स्पाइक प्रोटिन उत्परिवर्तन तसेच व्हायरल जीनोमच्या इतर भागांमध्ये उत्परिवर्तन समाविष्ट आहे.
  • हे संभाव्य जैविकदृष्ट्या महत्त्वाचे उत्परिवर्तन आहेत जे लस, उपचार आणि संसर्गाच्या संदर्भात विषाणूचे वर्तन बदलू शकतात.

 

दक्षिण आफ्रिकेनंतर बोत्सवाना, हाँगकाँगमध्येही नव्या व्हेरिएंटचा संसर्ग!

  • झपाट्याने पसरणारा कोरोनाचा नवीन प्रकार, दक्षिण आफ्रिकेनंतर बोत्सवाना, हाँगकाँगमध्येही आढळला संसर्ग
  • कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
  • दक्षिण आफ्रिकेत सापडलेला नवीन व्हेरिएंट झपाट्याने पसरत आहे.
  • दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्येही या प्रकाराची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत.

 

B.1.1 कोरोना व्हेरिएंट उपचार न झालेल्या एचआयव्ही रुग्णांपासून?

  • कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराला B.1.1 असे नाव देण्यात आले आहे, जो आता अनेक देशांमध्ये पसरत आहे.
  • उपचार न केलेल्या एचआयव्ही-एड्स रुग्णापासून ते विकसित झाले असावे असा संशय आहे.
  • लंडनमधील यूसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक फ्रांकोइस बॅलॉक्स यांनी म्हटले आहे की तीव्र संसर्गाच्या काळात ते विकसित होण्याची शक्यता असते.
  • या टप्प्यावर संसर्ग किती पसरू शकतो याचा अंदाज लावणे फार कठीण आहे. B.1.1 प्रकारावर अजून संशोधनाची गरज आहे.
  • त्याची लागण झालेल्या रुग्णांवर बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण करणे आवश्यक आहे.

 

B.1.1 व्हेरिएंटमुळे १२००हून अधिक संक्रमित झाले आहेत!

  • आतापर्यंत, दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्ये कोरोना विषाणूच्या या प्रकाराने संक्रमित रुग्णांची संख्या बाराशेच्या पुढे गेली आहे आणि ही आकडेवारी वेगाने वाढत आहे.
  • संशोधकांचे म्हणणे आहे की सध्याची कोरोना लस कोरोना विषाणूच्या या प्रकारावर काम करेल की नाही याबद्दल काहीही सांगणे खूप लवकर आहे.

Tags: coronacorona new variantIndiaSouth Africaएचआयव्ही-एड्सकोरोनाकोरोनाचा नवा व्हेरिएंटदक्षिण आफ्रिकाब्रिटनभारत
Previous Post

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट…भारतातही अलर्ट! परदेशातून येणाऱ्यांवर कडक लक्ष!!

Next Post

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

Next Post
Ajit pawar on marty

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!