Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

November 26, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Ajit pawar on marty

मुक्तपीठ टीम 

 “मुंबईवरील २६/११ (२००८) दहशतवादी हल्ल्यावेळी शहराचं रक्षण, नागरिकांचा जीव वाचवताना मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक, अग्निशमन, सर्वच सुरक्षा दलांच्या अधिकारी, जवानांनी असामान्य धैर्य, शौर्य, पराक्रमाचं दर्शन घडवलं. सामान्य मुंबईकरांनंही हल्ल्याचा निर्धारानं सामना केला. संयम पाळला. दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. आत्मघातकी दहशतवाद्याला जिवंत पकडण्याची ऐतिहासिक कामगिरी घडली. सव्वीस-अकराच्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या वीरांच्या त्यागाला, शौर्याला, देशभक्तीला तोड नाही. प्रत्येक भारतवासी या शहीदवीरांच्या त्यागाबद्दल कृतज्ञ राहील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीदवीरांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली आहे. हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांनाही उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस व अन्य सुरक्षा दलातील वीरांना मुंबई पोलीस आयुक्तालय येथे जाऊन मानवंदना दिली;स्मृतीस्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.शहीद पोलिसांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त केली.#MumbaiTerrorAttack pic.twitter.com/GWVDPa7Hmg

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 26, 2021

मुंबईवरील दहशतवादी हल्यातील शहीद वीरांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी पोलिसांनी, सुरक्षा दलांनी बजावलेली कामगिरी हा देशाचा गौरवशाली इतिहास आहे. मुंबईच्या रक्षणासाठी पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी, जवान त्यावेळी स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरला. जीवाची जोखीम पत्करुन कर्तव्यनिष्ठेने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या वीराने शरीरावर गोळ्या झेलून कसाबसारखा आत्मघातकी दहशतवादी जिवंत पकडून दिला. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुंबई पोलिसांनी देशरक्षणासाठी बजावलेलं कर्तव्य, केलेला त्याग देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. मुंबई पोलिसांचं हौतात्म्य भावी पिढीला देशसेवेची, कर्तव्याची जाणीव करुन देईल. नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ करील, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबई पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून लढताना सैन्यदल, राष्ट्रीय सुरक्षा दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, भारतीय रेल्वे, आरोग्य सेवेचे डॉक्टर-कर्मचारी, ताजमहल व ट्रायडंट हॉटेलचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांनीही देशभक्ती, साहस, मानवतेचे अलौकिक दर्शन घडवले. या सर्वांच्या कामगिरीचं स्मरण करुन त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. राज्य पोलिसांनी ‘कोरोना’काळात बजावलेल्या कामगिरीचं कौतुकही उपमुख्यमंत्र्यांनी केलं. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीदवीरांना श्रद्धांजली वाहत असताना यापुढच्या काळात शहराचं पोलिस दल हे अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या संदर्भात जागतिक तोडीचं असेल. पोलिसांचं मनोबल सदैव उंच राहील. जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दल ही प्रतिमा अधिक ठळक होईल, यासाठी शासन व नागरिकांनी मिळून प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Tags: २६/११ (२००८) दहशतवादी हल्ला26/11 Mumbai terror attackajit pawarmumbai policeअजित पवारमुंबई पोलिस
Previous Post

उपचार न केलेल्या एचआयव्ही-एड्स रुग्णांपासून कोरोनाचा नवा व्हेरिएंट विकसित झाल्याची शक्यता! ब्रिटनने सहा देशांची विमानं रोखली!

Next Post

संविधान दिनानिमित्त देशाच्या उभारणीतील संविधानाच्या वाट्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण!

Next Post
constitution day

संविधान दिनानिमित्त देशाच्या उभारणीतील संविधानाच्या वाट्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!