Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत अभिनेत्याच्या पत्नीचं हनीट्रॅप रॅकेट, ग्रामीण महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची वसुली!

November 22, 2021
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
honeytrap 1

मुक्तपीठ टीम

मुंबई पोलिसांनी हनी ट्रप प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. हनी ट्रॅप लावून बढ्या उद्योगपती आणि व्यावयायिकांकडून कोट्यावधी रुपये उकळणाऱ्या टोळीवर ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या कारवाईत एका महिला फॅशन डिझायनरचा समावेश असून ती नव्वदच्या दशकातील एका बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी सपना उर्फ लुबना वजीर ही हनीट्रॅप रॅकेटची सूत्रधार आहे.
  • मुंबईतील जुहू, वांद्रे, लोखंडवाला ते गोव्यापर्यंत किटी पार्ट्या आणि इतर सोशलिंगचे कार्यक्रम करत असे.
  • या माध्यमातून लोकांशी मैत्री करुन सावजाचा शोध घेतला जात असे.
  • या रॅकेटने मोडस ऑपेरेंडीनुसार त्यांनी शेकडो जणांना चुना लावला आहे.

 

नेमकं काय घडलं?

  • कोल्हापूर जिल्ह्यातील एक व्यापारी या रॅकेटचं लक्ष्य ठरला.
  • त्या व्यापाऱ्याची गोव्यातील एका व्यक्तीशी ओळख झाली.
  • २०१९ मध्ये हा व्यापारी मुंबईतील अंधेरी परिसरात आला होता.
  • आरोपीने व्यापाऱ्याची फायानान्सरसोबत मीटिंग असल्याचं सांगून आपल्या दोन मैत्रिणींना एका पंचतारांकित हॉटेलच्या आलिशान खोलीत भेटायला पाठवले.
  • आपण बिझी असून येणं शक्य नसल्याचा खोटा निरोप फायनान्सरच्या नावे दिला.
  • दोन्ही महिलांनी व्यापाऱ्यासोबत थोडा वेळ गप्पा मारुन खोलीतच जेवणाची ऑर्डर दिली.
  • यानंतर एक महिला बाहेर कोणीतरी भेटायला आल्याचे सांगून खोलीतून निघून गेली तर दुसरी महिला वॉश रूम मध्ये गेली.
  • थोड्या वेळाने बाहेर गेलेल्या महिलेने येऊन दारावरची बेल वाजवली.
  • व्यापाऱ्याने दरवाजा उघडला.
  • त्याच वेळी वॉशरुममध्ये गेलेली महिला बाहेर आली, मात्र तिच्या अंगावर कपडे नव्हते, तर तिने एक ब्लँकेट गुंडाळले होते.
  • व्यापाऱ्याने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून ती रडू लागली.

व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

  • दुसऱ्या महिलेने तात्काळ आरोपी आणि तिच्या महिला साथीदाराचा (कथित पीडित) त्याच अवस्थेत व्हिडिओ बनवला आणि त्याच वेळी त्यांचा पुरुष साथीदारही तिथे आला.
  • त्यानंतर त्याने आधी व्यावसायिकाला धमकावले, त्यानंतर व्हिडिओच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
  • व्यावसायिकाकडून ३ कोटी २६ लाख रुपये उकळले आहेत.
  • अखेर व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली असता या हनी ट्रॅपमागे दोन पुरुष आरोपीही असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
  • मात्र पुढील तपास सुरु आहे.

 

पोलिसांची शोध मोहीम

  • बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी सपना उर्फ लुबना वजीर हिच्याशिवाय दोन पुरुष मॉडेल आणि एक महिला मॉडेल फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे.
  • अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर लुबना वजीर उर्फ सपनाच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिच्याकडे २९ लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली.
  • तर ७ मोबाईल फोन, २ कार आणि ८ लाखांहून अधिक किमतीचे दागिने सापडले.

Tags: honey trapmumbai policeमुंबई पोलीसमोडस ऑपेरेंडीलुबना वजीरहनी ट्रॅप
Previous Post

सातारच्या गांजे गावातील पहिली लेक सैन्यात! गावानं स्वागत केलं झोकात!!

Next Post

स्टेट बँकेची जनधन गरीब खातेधारकांकडून १६४ कोटींची लूट

Next Post
SBI and Jandhan

स्टेट बँकेची जनधन गरीब खातेधारकांकडून १६४ कोटींची लूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!