Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्यांचं नवं लक्ष्य…सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील! जालना घोटाळ्यात पत्नी, सासऱ्यांचं नाव घेतलं!

November 21, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
kirit somaiya targets vihwas nagare patil relatives

मुक्तपीठ टीम

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. जालना साखर कारखाना घोटाळा अर्जुन खोतकरांनी केला आहे. त्यात विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रूपाली विश्वास नांगरे-पाटील, त्यांचे सासरे पद्ममाकर मुळे यांचीही नावे आहेत. या प्रकरणाची सीबीआय किंवा न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली. तसेच विश्वास पाटील यांना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा, अशी मागणी केलीय.

 

काय म्हणाले सोमय्या?

  • सोमय्या म्हणाले, चोरी केली नाही तर आनंद अडसूळ का लपून बसलेत.
  • आता मी आणखी एक नाव वाढवत आहे.
  • मी अर्जुन खोतकरांच्या जालना सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढला आहे.
  • खोतकरांनी स्पष्टीकरण दिलेय की त्याचा आणि माझा संबंध काय.
  • मात्र, माझ्याकडे त्याची कागदपत्रे आहेत.
  • जालना साखर कारखान्याचा मालक अर्जुन इंडस्ट्रीज आहे.
  • त्याचे मालक कोण आहेत.
  • २०१८ ला अर्जुन शुगर इंडस्ट्रीजची स्थापना अर्जुन खोतकर यांनी केली.
  • फेब्रुवारी २०१२ ला कारखाना आजारी पडला.
  • त्याचे टेंडर २८ फेब्रुवारीला निघाले.
  • निविदा तापडिया कंपनीच्या नावाने दिली गेली.
  • या कंपनीने कारखाना विकत घेताना बांधकाम करणार म्हणून ताब्यात घेणार म्हटले.
  • ४२ कोटी १८ लाख ६२ हजारांत विकत घेतला.
  • हिम्मत असेल, तर मुख्यमंत्री आणि अर्जुन खोतकरांना उत्तर द्यावे.

जालना साखर कारखान्यांचे दोन मालक!

  • सोमय्या पुढे म्हणाले की, जे महाराष्ट्र सहकारी बँकेला भरले ते पैसे कोणी दिले ?
  • १० जूलै २०२० ला जे प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांना दिले त्याचे पैसे हे अर्जुन खोतकरांनी दिलेत, असे तापडिया कंपनीने सांगितले.
  • २३ नोव्हेंबरला २०१२ ला आम्ही ४३ कोटी रुपयांना कारखाना विकला.
  • जे जरंडेश्वर कारखान्यांत अजित पवारांनी केले तेच खोतकरांनी केले आहे.
  • यात ६ शेअर होल्डर आहेत.
  • ६ पैकी ५ जण खोतकर परिवारातील आहेत.
  • ६ वं नाव आहे अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड.
  • जालना साखर कारखान्यांचे दोन मालक आहेत.
  • अर्जुन खोतकर, पद्माकर मुळे आणि दुसरे नाव रुपाली विश्वास नांगरे-पाटील.
  • नांगरे-पाटील म्हणजे मुंबई पोलिसांचे सहआयुक्त अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

सीबीआय चौकशीची मागणी

  • अर्जुन खोतकरांच्या या साखर कारखान्याची चौकशी बंद केली गेली.
  • मुंबई पोलिसांनी बंद करून रिपोर्ट कोर्टाला दिला.
  • या प्रकरणाची सीबीआय किंवा न्यायाधीशामार्फत चौकशी करा.
  • विश्वास नागरे पाटलांचे सासरे आणि अर्जुन खोतकर ९५० कोटींचे मालक आहेत.
  • त्यांनी हा कारखाना बेनामी पद्धतीने का विकत घेतला, असा सवाल त्यांनी केला.
  • या अर्जुन शुगर इंडस्ट्रीजची चौकशी करण्यासाठी सोमवारी दिल्लीला जाणार आहे.
  • ईडी, सहकार मंत्रालय येथे जाऊन भेट घेणार आहे आणि येणाऱ्या अधिवेशनात भाजपा आवाज उठवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Tags: Arjun KhotkarCBIKirit SomaiyaVishwas Nangre Patilअर्जुन खोतकरकिरीट सोमय्याजालना साखर कारखानापद्माकर मुळेरुपाली विश्वास नांगरे-पाटीलविश्‍वास नांगरे पाटीलसीबीआय
Previous Post

सावधान! तुमच्या स्मार्टफोनमुळेच तुम्ही हॅकिंगचे बळी ठरू शकता!

Next Post

केंद्र सरकार विकतेय ९७० कोटींची मालमत्ता…BSNL, MTNLच्या मुंबईसह देशातील मालमत्तांची यादी प्रकाशित!

Next Post
MTNL And BSNL

केंद्र सरकार विकतेय ९७० कोटींची मालमत्ता...BSNL, MTNLच्या मुंबईसह देशातील मालमत्तांची यादी प्रकाशित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!