Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या कस्टमर टेस्ट राईड कॅम्प्सना मुंबई-पुण्यातही चांगला प्रतिसाद

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
ola e scooter

मुक्तपीठ टीम

आता ओलाच्या ईलेक्ट्रिक स्कूटर्सच्या टेस्ट राइडची संधी मुंबई आणि पुण्यातही आहे. ओला एस१ आणि एस१ प्रो खरेदी केलेल्या आणि डिलिव्हरीमध्ये प्राधान्यक्रम देण्यात आलेल्या ग्राहकांसाठी केवळ आमंत्रणाद्वारे एक्सक्लुसिव्ह टेस्ट राईड्स सुरु आहेत. कस्टमर टेस्ट राईड्सची सुविधा आधी बुक केलेल्या टेस्ट राईड स्लॉट्सप्रमाणे दिली जात आहे. पहिल्या खरेदी टप्प्यामध्ये ज्या ग्राहकांनी स्कूटर खरेदी करण्यासाठी २०,००० रुपये किंवा संपूर्ण किंमत भरली आहे त्यांनाच, त्यांच्या प्रायॉरिटी डिलिव्हरी विंडोनुसार या टेस्ट राईड्समध्ये प्राधान्यक्रम दिला जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा ओलाने केला आहे.

 

कस्टमर टेस्ट राईड्स मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद आणि कोचीमधील ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आल्या असून पुढील काही दिवसात इतर शहरांमधील ग्राहकांना देखील त्यांचा लाभ घेता येईल. या कॅम्प्समध्ये ओला एस१ चा टेस्ट राईड अनुभव घेण्यासाठी ग्राहकांनी आपले टेस्ट राईड स्लॉट्स बुक करावेत असे आमंत्रण देण्यात येत आहे. मुंबईमध्ये हा कॅम्प रहेजा प्लॅटिनम (वीवर्क), साग बाग रोड, ऑफ अंधेरी कुर्ला रोड, मरोळ अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९ येथे आहे.

 

ओला एस१ आणि एस१ प्रो या संपूर्ण जगभरासाठी भारतात तयार करण्यात येत असलेल्या स्कूटर्स ओला फ्युचर फॅक्टरी या जगातील सर्वात मोठ्या, सर्वात आधुनिक आणि पर्यावरणस्नेही दुचाकी फॅक्टरीमध्ये निर्मित आहेत. सर्वोत्तम रचना, सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम कामगिरी यासारख्या अनेक, उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज अशा या स्कूटर्स आहेत. ओला एस१ प्रो १० अतिशय अनोख्या, उठावदार आणि आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून, ओला एस१ मध्ये ५ रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. ओला एस१ आणि एस१ प्रो च्या वैशिष्ट्यांची माहिती सोबत जोडलेली आहे.

अधिक व्हिज्युअल्स आणि अपडेट्स तसेच ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्हाला येथे फॉलो करा:

https://twitter.com/OlaElectric
https://www.instagram.com/olaelectric/?hl=en
https://www.facebook.com/pages/category/Science–Technology— Engineering/Ola-Electric-104817894981469/

 

किंमती:

एक्स-शोरूम किंमत (भारतीय रुपयांमध्ये) (एफएएमई सबसिडी आणि जीएसटी समाविष्ट आहेत पण राज्य सबसिडी आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत)

  • ओला एस१ – ९९,९९९ रुपये
  • ओला एस१ प्रो – १२९,९९९ रुपये
  • अंतिम किंमत (भारतीय रुपयांमध्ये) (लागू असलेली ऑन-रोड किंमत – राज्य सबसिडी, एफएएमई सबसिडी, नोंदणी, हेल्मेट(स), विमा आणि आरएसए, झीरो डेप यासारख्या त्यांच्या पर्यायी ऍड-ऑन्स यांचा समावेश असलेली)

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Customer Test Ride CampsmuktpeethOla Electric ScootersOla Electric Scooters Test RideOla S1Ola S1 Proओला ईलेक्ट्रिक स्कूटर्स टेस्ट राइडओला एस१ओला एस१ प्रोपुणेमुक्तपीठमुंबई
Previous Post

चला शिमला आणि मनालीला, कमी खर्चात हिमवर्षावाचा आनंद अनुभवा!

Next Post

भारतीय लष्कराच्या सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत २०० जागांसाठी भरती

Next Post
indian army

भारतीय लष्कराच्या सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत २०० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!