Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चला शिमला आणि मनालीला, कमी खर्चात हिमवर्षावाचा आनंद अनुभवा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, निसर्ग
0
shimla manali

मुक्तपीठ टीम

या वेळी हिवाळ्याच्या मोसमात, जर तुम्हाला मस्त हिमवर्षावाचा आनंद लुटायचा असेल तर तुम्हाला उत्तर भारतातील हिमालयाच्या सान्निध्यात जावं लागेल. त्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीने आणलेली एक भन्नाट ऑफर उपयोगी पडेल. तुम्ही आयआरसीटीसीच्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. सुंदर बर्फाळ पर्वतांचा आनंद घेण्यासाठी हिमाचल प्रदेशात अनेक उत्तम पर्यटन स्थळं आहेत. हिमाचलची राजधानी असलेल्या शिमला आणि मनालीला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. हिवाळ्यातील हिमवर्षावानंतर शिमला आणि मनालीचे दृश्य वेगळे असते, या दोन ठिकाणांना भेट देण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आयआरसीटीसी एक उत्तम हवाई टूर पॅकेज देत आहे.

 

हवाई टूर पॅकेजमध्ये चंदीगडलाही भेट देण्याची संधी

  • आयआरसीटीसी टूर पॅकेजचे वैशिष्ट्य म्हणजे यात कुल्लू-मनाली आणि शिमला तसेच चंदीगडला जाण्याची संधी मिळणार आहे.
  • हे टूर पॅकेज कोची विमानतळावरून सुरू होईल.
  • पर्यटक कोची विमानतळावरून चंदीगडला जातील.
  • चंदीगडला पोहोचल्यानंतर प्रवासी रस्त्याने शिमलासाठी रवाना होतील.
  • शिमल्यात पोहोचल्यानंतर, प्रवासी रात्रीची विश्रांती आणि रात्रीचे जेवण थेट हॉटेलमध्ये घेतील.
  • दुस-या दिवशी न्याहारीनंतर पर्यटक शिमल्याजवळील कुफरी या हिल स्टेशनला रवाना होतील.
  • संध्याकाळी, प्रवासी कुफरीला भेट देऊन मॉल रोड शिमला येथे परततील.

 

हवाई टूरद्वारे हिडिंबा देवीच्या दर्शनाचीही सोय

  • दुसऱ्या दिवशी न्याहारी झाल्यानंतर प्रवासी मनालीला रवाना होतील.
  • मनालीला जाताना प्रवासी कुल्लूलाही भेट देतील.
  • मनालीला पोहोचल्यानंतर पर्यटक हॉटेलमध्ये चेक इन करतील. ४. हॉटेलमध्ये रात्री विश्रांती घेतल्यानंतर, प्रवासी दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून मनालीला रवाना होतील.
  • मनालीमध्ये, प्रवासी हिडिंबा मंदिर, मनु मंदिर, वशिष्ठ मंदिर स्नान, वन विहार, तिबेटी मठ आणि क्लब हाऊस सारख्या ठिकाणी भेट देतील.
  • दुसऱ्या दिवशी प्रवासी रोहतांग पास आणि अटल बोगद्याकडे रवाना होतील.
  • प्रवासी रोहतांग पास मार्गे मनालीला परतताना सोलांग व्हॅलीला जातील. दुसऱ्या दिवशी प्रवासी मनालीहून चंदीगडला रवाना होतील.

 

कमी किंमतीचे असणार पॅकेज

चंदीगडला पोहोचल्यावर, हॉटेलमध्ये रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर प्रवासी दुसऱ्या दिवशी चंदीगडमधील रॉक गार्डन आणि पार्टीशन म्युझियमला भेट देतील. दुपारी, प्रवासी चंदीगड विमानतळावरून कोचीला परत जातील. मनाली आणि शिमला या ६ रात्र आणि ७ दिवसांच्या टूर पॅकेजसाठी तुम्हाला ३४,९९५ रुपये खर्च करावे लागतील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Indian RailwayIndian Railway Catering and Tourism Corporationirctc tourismmanalimuktpeethshimlaआयआरसीटीसीभारतीय रेल्वेमनालीमुक्तपीठशिमलाहवाई टूर
Previous Post

शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी महाराष्ट्रात आता ७५ आणि ८० टक्के अनुदान!

Next Post

ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या कस्टमर टेस्ट राईड कॅम्प्सना मुंबई-पुण्यातही चांगला प्रतिसाद

Next Post
ola e scooter

ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या कस्टमर टेस्ट राईड कॅम्प्सना मुंबई-पुण्यातही चांगला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!