मुक्तपीठ टीम
शुक्रवारी गुरु नानक जयंतीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीएक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचललं. त्यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या अचानक झालेल्या घोषणेने देशवासीयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आणि स्वागताच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. शेतकऱ्यांनी तर जिलेबी वाटत आनंद साजरा केला. पण काहींना मोदींचा निर्णय खूपच नाराज करणारा ठरला. भाजपा समर्थक अभिनेत्री कंगणा राणावतांना तो जिहादींचा विजय वाटला, तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यामते या निर्णयामुळे हा दिवस काळा दिवस ठरला आहे.
कंगणाला देश जिहादी राष्ट्राची भीती
- पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना राणौत आजकाल तिच्या स्वातंत्र्याच्या वक्तव्यामुळे आणि महात्मा गांधींवर टीका केल्यामुळे चर्चेत आहे. आता कृषी कायद्याच्या पुनरागमनावर आपले मत व्यक्त करताना कंगनाने हे दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.
- कंगना म्हणाली की, खरी शक्ती स्ट्रीट पॉवर आहे. ते सिद्ध झाले आहे. दुःखद, लज्जास्पद आणि योग्य नाही. निवडून आलेल्या संसदेऐवजी लोक रस्त्यावर कायदे करू लागले, तर हे जिहादी राष्ट्र बनेल.
दरेकर-खोतांसाठी काळा दिवस!
- विरोधी पक्षनेते दरेकर म्हणतात, शरद जोशींचा आत्मा अस्वस्थ!
- आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस आहे.
- जेव्हा केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले तेव्हा मी म्हणालो होतो की, शरद जोशींच्या आतम्याला शांती लाभली असेल.
- आज शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी कायदे मागे घ्यावे लागले आहेत.
- मला वाटतं पुन्हा शरद जोशींचा आत्मा अस्वस्थ झाला असेल, असं त्यांनी सांगितलं.
शेतकरी नेते सदाभाऊ खोत म्हणाले
- मोदींनी शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आंदोलनातील हवा निघून काढून घेतली आहे. विषय प्रतिष्ठेचा न करता मोदींनी शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणेच केलं आहे. त्यांनी स्वत:च्या मनासारखं केलं नाही.
- हे कायदे देशातील ८० टक्के शेतकऱ्यांसाठी होता.
- ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरापेक्षा कमी शेती आहे. त्यांच्या आर्थिक विकासासाठी हे कायदे आणले होते.
शेतकऱ्यांसाठी काळा दिवस!
- शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस आहे.
- शेतकऱ्यांना या कायद्याने स्वातंत्र्य मिळणार होते ते हिरावून घेतले, शेतकरी नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
- मूठभर दलाल आडती हे आज जिंकले, पण दलालच्या तावडीतून सुटू इच्छिणारा शेतकरी मात्र हारला , त्याचा पराभव झाला आहे.
- पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश शेतकरी मार्केट कमिटी भोवती बाजारपेठ फिरत असते, त्यांच्या टक्केवारी मिळते.
- कोट्यवधी रुपयांचा यात भ्रष्टाचार होत आहे त्यांना आता संधी मिळाली.