मुक्तपीठ टीम
मालेगावातील रझा अकादमीच्या कार्यालयावर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. या छापेमारीत झडती घेत काही पत्रके व दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ रझा अकादमीने मालेगावात मोर्चा काढला होता. या मोर्चात दगडफेक आणि तोडफोड झाली होती.
मालेगाव पोलिसांची कारवाई
- मालेगाव शहरातील रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला.
- पोलिसांनी कार्यालयाची झडती घेतली.
- यावेळी पोलिसांनी काही कागदपत्रे जप्त केली.
- तसेच पोलिसांनी या प्रकरणी वेगवेगळे ४ गुन्हे दाखल केले आहेत.
- त्यात रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.
- विशेष म्हणजे पोलिसांनी या हिंसाचार प्रकरणी जवळपास ४२ संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
रझा अकादमीच्या लोकांना पैसे वाटपाचा आरोप
- आमदार मौलाना मुफ्ती म्हणाले की, दंगलीप्रकरणी अटक केलेला एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. (याचा इंकार झाला आहे)
- एक संशयित नगरसेवक जनता दलाचा असून, तो सध्या फरार आहे.
- मुंबईतून रझा अकादमीच्या काही लोकांना पैसे वाटले.
- दंगलीच्या एकदिवस अगोदरच्या रात्री दंगेखोरांनी दगड आणून ठेवले होते.
- वीस वर्षांपासून मालेगाव शांत आहे.
- मात्र, काही जण ते मुद्दाम पेटवत आहेत, असा आरोप आमदार मौलाना मुफ्ती यांनी केला.