Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साखर कारखान्यांसाठीच्या दक्षता पुरस्कारात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार

November 17, 2021
in घडलं-बिघडलं
0
राष्ट्रीय फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फॅक्ट्रीज्स ली. च्या वतीने ‘दक्षता पुरस्कारा’चे वितरण 1

मुक्तपीठ टीम 

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी देण्यात आलेल्या पुरस्कारामंध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवून देशस्तरावर मोहोर उमटवली आहे.

 

येथील एपिडा सभागृहात राष्ट्रीय फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फॅक्ट्रीज्स ली. च्या वतीने ‘दक्षता पुरस्कारा’चे  वितरण करण्यात आले. वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ च्या  पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा, राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य खासदार शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक प्रकाश नायकनवरे, यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर  उपस्थित होते.

 

वर्ष २०१९-२० मध्ये एकूण ९२ तर वर्ष २०२०-२१ मध्ये १०८ साखर कारखान्यांनी पुरस्कारांसाठी भाग घेतला होता. कारखान्यांचे मूल्यमापन विविध निकषांच्या आधारावर करून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मुल्यमापनासाठी सरासरी दहा टक्के  व त्याहून अधिक साखरेचा उतारा असलेले आणि दहा टक्क्यांपेक्षा कमी उतारा असलेले साखर कारखाने अशा दोन श्रेणींमेध्ये मूल्यमापन झाले. केन डेव्हल्पमेंट पुरस्कार, तांत्रिक दक्षता पुरस्कार, आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार, सर्वाधिक केन क्रशिंग पुरस्कार, सर्वाधिक साखर वसुली पुरस्कार, उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार, कमाल साखर निर्यात पुरस्कार अशी पुरस्कारांची विभागणी करण्यात आलेली आहे. पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री वर्मा, खासदार पवार, वळसे-पाटील, टोपे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.

 

वर्ष २०१९-२० चे  पुरस्कार

  • ‘वसंतदादा पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ हा पुरस्कार साखर कारखान्यांच्या सर्वसमावेशक कामांसाठी दिला जातो. हा पुरस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखाना मर्यादित, आंबेगाव पुणे यांना मिळाला.
  • प्रथम आणि व्दितीय ‘केन डेव्हल्पमेंट पुरस्कार’ महाराष्ट्राच्या डॉ पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाना मर्यादित, कडेगाव सांगली आणि अंजिक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्यादित शेंद्रे, सातारा यांना‍ प्राप्त झाला .
  • ‘तांत्रिक दक्षता पुरस्कार’ हा पुरस्कार राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांना मिळाला आहे. यामध्ये विघ्नहर सहकारी साखर कारखाना मर्यादित जुन्नर, पुणे आणि क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापु लाड सहकारी साखर कारखाना मर्यादित पलुस, सांगली यांना मिळाला आहे.
  • ‘आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार’ चा द्वितीय पुरस्कार राज्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना मर्यादित अंबड, जालनाला  मिळाला.
  •  ‘सर्वाधिक साखर वसुली पुरस्कार’ चा  प्रथम पुरस्कार राज्यातील कुंभी-केसरी सहकारी साखर कारखाना मर्यादित, करवीर, कोल्हापूर ला मिळालेला आहे.

  • ‘कमाल साखर निर्याती पुरस्कार’ चा प्रथम पुरस्कार जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित हातकणंगले, कोल्हापूर आणि द्वितीय पुरस्कार सह्याद्री सहकारी साखर कारखाना मर्यादित कराड, साताराला प्रदान करण्यात आला आहे.

 

वर्ष २०२१-२१ चे पुरस्कार 

  • ‘वसंतदादा पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ हा श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना मर्यादित माळशिरस, सोलापूर यांना प्रदान करण्यात आला.
  • सर्वसमावेशक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पश्चिम झोनचा पुरस्कार श्री छत्रपती शाहु सहकारी साखर कारखाना मर्यादित कागल, कोल्हापूरला मिळाला.
  • प्रथम आणि व्दितीय केन डेव्हल्पमेंट पुरस्कार राज्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित शिरोळा, कोल्हापूर आणि राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना मर्यादित वाळवा, सांगली ला प्राप्त झाला आहे.
  • तांत्रिक दक्षता पुरस्कार हा पुरस्कार राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांना मिळाला आहे. यामध्ये  श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना मर्यादित जुन्नर, पुणे आणि डॉ.पंतगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना मर्यादित कडेगाव, सांगली ला मिळाला आहे.
  • ‘सर्वाधिक ऊस गाळपचा पुरस्कार’  जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित हातकणंगले, कोल्हापूरला  प्राप्त झाला आहे.
  •  ‘सर्वाधिक साखर वसुलीचा पुरस्कार’  अज्यिंकतारा सहकारी साखर कारखाना मर्यादित शेंद्रे, साताराला प्राप्त झाला आहे.
  • ‘कमाल साखर निर्यातीचा प्रथम पुरस्कार’ विठ्ठलराव शिंदे शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित माढा, सोलापूर आणि व्दितीय पुरस्कार सह्याद्री सहकारी साखर कारखाना मर्यादित कराड, सातारा ला प्रदान करण्यात आला आहे.

 


Tags: dilip walse patilMaharashtraNational Federation of Cooperative Sugar Factories Ltd.Rajesh Topeदिलीप वळसे पाटीलमहाराष्ट्रराजेश टोपेराष्ट्रीय फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फॅक्ट्रीज्स ली
Previous Post

कौटुंबिक हिंसाचार कायदा नेमका कोणासाठी, कधी, कसा वापरता येतो?

Next Post

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता…हवामान खात्याचा इशारा!

Next Post
Heavy rainfall expected in these states

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता...हवामान खात्याचा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!