Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिकांचा नवा ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट’ गौप्यस्फोट! काशिफ खानला अटक का नाही?

व्हाइट दुबई आहे तरी कोण? महाराष्ट्रातच धाडी, गोव्यात का नाही?

November 16, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
nawab malik ask Why no action against kashiff khan

मुक्तपीठ टीम

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची मालिका पुढे सुरु ठेवली आहे. सातत्याने पुरावे सादर करत मलिक हे समीर वानखेडे आणि भाजपावर टीका करत असतात. मंगळवारीही नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचे काय संबंध आहेत? काशिफ खानच्या विरोधात पुरावे देऊनही त्याला अटक का केली जात नाही? या प्रकरणातील व्हाईट दुबई कोण आहे? त्यालाही अटक का केली जात नाही?, असे सवाल केले आहेत. आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी काही व्हॉट्सअ‍ॅप चॅटही सादर केले.

 

व्हाइट दुबई आहे तरी कोण?

  • नवाब मलिक यांनी मंगळवारी सकाळीच ड्रग्ज प्रकरणी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली.
  • त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देतानाच एनसीबीवर प्रश्नांची सरबत्ती केली.
  • मला एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट मिळालं.
  • त्यानुसार व्हाईट दुबई नावाचा व्यक्ती आहे.
  • त्याची माहिती या चॅटमधून दिली जात आहे.
  • केपी गोसावी फोटो पाठवायला सांगतात.
  • त्यानंतर काशिफ खानचा फोटो पाठवला जातो.
  • ज्या प्रमाणे फोटोच्या आधारे लोकांना ओळख करून ताब्यात घेतलं गेलं.
  • त्याच पद्धतीने काशिफ खानला अटक का करण्यात आली नाही?
  • त्याला सेफ पॅसेज का दिला?
  • तो क्रुझवर दोन दिवस काय करत होता?

 

महाराष्ट्रातच धाडी, गोव्यात का नाही?

  • काशिफ खान हा गोव्यात लपून बसला आहे.
  • एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे झोनल डायरेक्टर असताना त्यांच्याकडे गोव्याचा चार्ज होता.
  • गोव्यात ड्रग्ज टुरिझम चालतं हे जगभरातील लोकांना माहीत आहे.
  • रशियन माफीया हे ड्रग्जचं रॅकेट चालवतात.
  • पण गोव्यात कोणतीही कारवाई होत नाही.
  • कारण काशिफ खानकडून गोव्यात हे रॅकेट चालवलं जातं.
  • काशिफ खान आणि वानखेडेंचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे काशिफवर कारवाई होत नाही.
  • तुम्ही काशिफ खानला का बोलवत नाही?
  • व्हाईट दुबईला का अटक झाली नाही?
  • अशी माझी तुम्हाला विचारणा आहे.

 

काशिफला का वाचवलं जात आहे?

  • काशिफ खान आणि वानखेडे यांचे काय संबंध आहेत? त्याची माहिती एनसीबीने द्यावी.
  • काशिफवर देशभरात गुन्हे आहेत.
  • चार दिवसांपूर्वी त्याच्यावर फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • त्याला का वाचवलं जात आहे हे सांगावं.
  • एका कोर्टाने त्याला फरार घोषित केलं आहे.
  • तरीही त्याला का वाचवलं जात आहे?

Tags: GoaMaharashtraNawab MalikSameer Wankhedewhatsapp chatWhite Dubaiकाशिफ खानगोवानवाब मलिकमहाराष्ट्रव्हाईट दुबईव्हॉट्सअ‍ॅप चॅटसमीर वानखेडे
Previous Post

बैलगाड्या शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध – मंत्री सुनील केदार

Next Post

साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांना ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार

Next Post
Bhagyashree Banayat

साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांना 'स्कॉच' राष्ट्रीय पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!