Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बैलगाड्या शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध – मंत्री सुनील केदार

November 16, 2021
in घडलं-बिघडलं
0
bullock cart race

मुक्तपीठ टीम

बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याची माहिती, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

 

राज्यात बैलगाड्या शर्यती सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. बैलगाड्या शर्यतीसंदर्भात वरिष्ठ अधिवक्ता आणि राज्य शासनाचे वकील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी केदार दिल्लीत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्राने बैलगाडी शर्यत सुरू होण्याबाबत २०१७ रोजी कायदा संमत केला होता. तथापि, त्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर, शासनाने या आदेशास अनुसरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण विस्तारित बेंचकडे प्रलंबित असून पुढील आठवड्यात याबाबत निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या सविस्तर चर्चेसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने उपस्थित अधिवक्त्यांशी चर्चा करण्यात आले असल्याचे केदार यांनी नमूद केले.

 

देशातील इतर राज्यात तामिळनाडू, कर्नाटका, मध्यप्रदेश आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाड्यांच्या शर्यती होत असतात. मात्र मुंबई उच्च न्यायालायाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात शर्यतींना बंदी लावण्यात आली आहे. ही बंदी उठवावी व बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा राज्यात सुरू व्हाव्यात असे त्यांनी अधोरेखित केले.

 

राज्यशासन यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असून यावर अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून ॲड. मुकूल रोहतगी, ॲड. शेखर नापडे आणि ॲड. सचिन पाटील यांची नेमणूक केल्याची त्यांनी माहिती दिली.

 

महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीची ४०० वर्षांपेक्षा जूनी पंरपरा आहे. “बैलगाडी शर्यत” हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. शर्यतीसाठी शेतकरी खास खिल्लार जातीचे बैल वापरतात त्यांचे संगोपण करतात. खिल्लार ही महाराष्ट्रातच सापडणारी बैलांची जात आहे. शर्यती बंद असल्यामुळे खिल्लारच्या खोडांना मागणी बंद झाली, तसेच शर्यती बंद असल्यामुळे गावांच्या जत्रा भरत नाहीत. शेतकऱ्यांच्या जीवनातील हा सांस्कृतिक भाग म्हणून याकडे पाहण्यात यावे, अशी मागणीही बैलगाडा संघटनेकडून असल्याचेही श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.

 

पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शैलेश येंडे, सहायक आयुक्त डॉ. प्रशांत भड आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे राज्याचे प्रतिनिधी रामकृष्ण टाकळकर, संदीप बोदगे हेही याप्रकारणाच्या पाठपुराव्यासाठी दिल्लीत आहेत.


Tags: bullock cart racemumbai high courtstate governmentSUNIL KEDARबैलगाडी शर्यमुंबई उच्च न्यायालयराज्यशासनसुनील केदार
Previous Post

मुस्लिम मुलांना प्रशासकीय अधिकारी बनवायचा निर्धार करा – प्रा.सलमान सय्यद

Next Post

नवाब मलिकांचा नवा ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट’ गौप्यस्फोट! काशिफ खानला अटक का नाही?

Next Post
nawab malik ask Why no action against kashiff khan

नवाब मलिकांचा नवा 'व्हॉट्सअ‍ॅप चॅट' गौप्यस्फोट! काशिफ खानला अटक का नाही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!